शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शालिमार एक्स्प्रेसमध्ये मद्यधुंद सफाई कामगारांची प्रवाशासोबत हुज्जत, बॅग फेकण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 13:16 IST

कुर्ला टर्मिनस येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशन येऊन थांबली असता मद्यधूंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेला व बाथरूम जवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करीत हुज्जत घातली

सुरेश लोखंडे 

ठाणे : कुर्ला टर्मिनस येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशन येऊन थांबली असता मद्यधूंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेला व बाथरूम जवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करीत हुज्जत घातली. एवढेच नव्हे तर त्याची बॅग हिसकवण्याचाही प्रयत्न केला. ठाणे स्टेशन सोडल्यानंतरही या कामगारांची दमदाटी सुरूच होती.

ठाणे येथून रात्री सुमारे 10.15 वाजे दरम्यान ही गाडी सुटलेली असतानाही कामगारांची ही दहशत सुरूच होती.कल्याणला उतरण्यासाठी काही जण आधीच दरवाज्यात आले. त्यांना ही मनमानी लक्षात आली. भीती वाटणारा त्यांचा आवतार पाहून कोणी ही पुढे येऊन बोलण्यास तयार नव्हते. यावेळी काही जणांनी एकत्र येऊन ही मनमानी थांबवण्याचा प्रयत्न केला. रात्री - बेरात्री बाथरूमला येणा-या महिला प्रवाशांना देखील या मद्यधूंद कामगारांचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन बोगीतील टीसी मास्तरला हा प्रकार निदर्शनात आणून दिला.

रेल्वेच्या लांबपल्याच्या गाड्यांमधील बाथरूम सपाईसाठी खासगी कंत्राटाद्वारे सफाई कामगार ठेवले जात आहेत. पण तसे फारसे उपयुक्त ही ठरत नसलेल्या या कामगारांची दहशत मात्र जीवघेणी ठरत आहे. मद्यधूंद अवस्थेतील हे कामगार बोगीत रात्री बेरात्री कारण नसतानाही हिंडत असतात. त्यांच्यातील काही कर्मचारी गुन्हेगार प्रवृत्तीचे असण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे वर्तनही योग्य नसल्याचे आढळून येते. या मद्यधुंद अवस्थेतील कामगारांपासून महिला प्रवाशांच्या जीवावर बेतण्याचा अतिप्रसंग व चीजवस्तू लांबवण्याच्या दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची अपेक्षा आहे.

मंगळवारी रात्री कल्याण स्टेशन येईपर्यंत या कामगारांचा धुमाकूळ सुरूच होता. ते मोठमोठ्याने आवाजही करीत होते. ते कोणाचे ऐकूनही घेत नव्हते. बोगी क्रमांक 4 मधील हा प्रकार टीसींच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी कामगारांच्या मॅनेजरच्या लक्षात आणून दिले. पण त्यानंतर या कामगारांना उतरवून देणे अपेक्षित होते. पण अशी कोणतीही कारवाई न झाल्याने आणि कामगार गाडीतच असल्याने संबंधीत प्रवाशास या कामगारांची भीती वाटत होती. प्रवासादरम्यान त्यांच्याकडून त्रास होण्याची शक्यता या प्रवाशाकडून व्यक्त करण्यात येत होती. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीCrimeगुन्हाIndian Railwayभारतीय रेल्वेthaneठाणे