शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

शहापूर-मुरबाड: आदिवासीवाडीतील ३४ जणांना पेढ्यांतून विषबाधा, २७ गंभीर, उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 02:32 IST

शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांच्या मध्यभागी असलेल्या संगमेश्वर या गावी पूजेसाठी आलेल्या एका जोडप्याने वाटलेल्या पेढ्यांमुळे तेथील आदिवासीवस्तीतील लोकांना विषबाधा झाली. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून विषबाधा झालेल्यांपैकी २७ जण गंभीर आहेत. हे पेढे वाटणाºया जोडप्याचा शोध सुरू आहे.

शहापूर / मुरबाड : शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांच्या मध्यभागी असलेल्या संगमेश्वर या गावी पूजेसाठी आलेल्या एका जोडप्याने वाटलेल्या पेढ्यांमुळे तेथील आदिवासीवस्तीतील लोकांना विषबाधा झाली. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून विषबाधा झालेल्यांपैकी २७ जण गंभीर आहेत. हे पेढे वाटणा-या जोडप्याचा शोध सुरू आहे.केलेला नवस फेडण्यासाठी एक जोडपे गुरुवारी संध्याकाळी येथे आले. त्यांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर प्रसादासाठी आणलेल्या पेढ्यांच्या बॉक्समधील एक पेढा पुजाºयाला दिला आणि उरलेले पेढे संगमवाडी या आदिवासीवस्तीत वाटून ते दोघे निघून गेले. मात्र, त्यानंतर येथील नागरिकांना मळमळ, उलट्या तसेच चक्कर येऊ लागल्याने इतर ग्रामस्थांनी त्यांना लगेचच सरळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तेथे पुरेशी सुविधा नसल्याने त्यांना मुरबाड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण ३४ बाधितांपैकी २७ जण गंभीर असून त्यांना उल्हासनगरातील सेंट्रल हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे. उर्वरित ७ जणांवर उपचार करून त्यांना शुक्रवारी सकाळी सोडून देण्यात आले. हा प्रकार कळताच मुरबाडचे पोलीस निरीक्षक अजय वसावे आणि तहसीलदार सचिन चौधर हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, हा प्रकार नेमका कसा घडला आणि हे प्रसाद वाटणारे जोडपे कोण आहेत, याचा तपास सुरू आहे.शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांच्या मध्यभागी असलेले संगमेश्वर हे खूप पूर्वीपासून नावाजलेले तीर्थक्षेत्र आहे. काळू नदी, डोईफोडी नदी तसेच गुप्तरूपाने वाहत असणारी एक नदी अशा तीन नद्यांचा संगम येथे झाल्याने या ठिकाणाला संगमेश्वर हे नाव पडले आहे. भाविक येथे पूजाअर्चा तसेच काही जण दशक्रिया विधी, तर नवस फेडण्यासाठी येतात. येथे शिवमंदिर आहे, त्यामुळे रोजच भाविक महादेवांचा अभिषेक करण्यासाठी येतात तसेच प्रसादाचे वाटपही केले जाते.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा