शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; १७ पैकी १४ मृतांची ओळख पटली

By श्याम बागुल | Published: August 01, 2023 11:05 AM

तातडीने मदतीसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या  घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

शाम धुमाळ,समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी पहाटे मोठी दुर्घटना घडली. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने 17 मजूर ठार झाले आहेत. तर. क्रेन आणि स्लॅब खाली अनेक जण दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, तातडीने मदतीसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या  घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गाच्याठाणे ते शिर्डी या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या सरु आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास देखील समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते. त्यावेळी शाहपूर सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर आणि क्रेन अचानक कोसळली. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन खाली असलेल्या मजूरांवर कोसळली. यात 17 मजूरांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. 16 मृतदेह हे शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तर तीन ते चार जण जखमी मजुरांवर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मृतांची नावे

अरविंद कुमार उपाध्याय (वय ३३, रा.उत्तरप्रदेश),  गणेश रॉय (वय ४३, रा. वेस्ट बंगाल), ललन राजभर (वय ३८, रा. उत्तरप्रदेश),  परमेश्वर सहानी (वय २५, रा. उत्तरप्रदेश), प्रदीप रॉय (वय ४५, रा. वेस्ट बंगाल), राजेश शर्मा (वय ३२, रा. उत्तराखंड),  संतोष जैन - प्रमुख (वय ३५, रा. तामिळनाडू), राधेश्याम यादव (वय ४०, रा. उत्तरप्रदेश),  आनंद यादव (वय २५, रा. उत्तरप्रदेश),  पप्पु कुमार (वय ३०, रा. बिहार), कनन (वय ४०, रा. तामिळनाडू),  सुब्रन सरकार (वय २३, रा. वेस्ट बंगाल) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. 

बळींची संख्या वाढण्याची भीती 

 घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे दोन पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत डॉग स्कॉड देखील असून ढीगाऱ्या खाली दबले असणाऱ्यांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत 17 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 3 जखमी झाले आहेत. आणखी सहा जण कोसळलेल्या इमारतीत अडकल्याची भीती आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. सध्या ढीगारा उपसण्याचे काम सुरू आहे. हे काम वेगाने सुरू आहे. मलब्याखाली आणखी काही जण असल्याची शक्यता असल्याने ती काळजी घेऊन बचाव कार्य सुरू आहे.

बचाव कार्य..

स्थानिक पोलीस,आपत्ती व्यवस्थापन टीम,स्थानिक ग्रामस्थ,कामगार,महसूल कर्मचारी यांनी पहाटे च्या वेळी मदत कार्य करून मृतदेह बाहेर काढले

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गthaneठाणेshahapurशहापूर