शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रश्न मांडूनही शहापूर तालुका मागास; आमदार पांडुरंग बरोरा यांच्या मतदारसंघाचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 00:36 IST

आज तालुक्यात पाण्याची समस्या कायम आहे. ती सोडविण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येतात.

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा असा शहापूर विधानसभा मतदारसंघ. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार म्हणून पांडुरंग बरोरा हे निवडून आले. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या काळात अनेक प्रश्न विधिमंडळात मांडून सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही आज शहापूर तालुक्याचे चित्र भयावह आहे.आमदार : पांडुरंग बरोरा, राष्ट्रवादीमतदारसंघ : शहापूरTOP 5 वचनं

  • तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविणे
  • बेरोजगारीचा प्रश्न सोडविणे
  • प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवणे
  • डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सोडविणे
  • गावागावात रस्ते करणे

त्यांना काय वाटतं?गेल्या पाच वर्षात तालुक्यातील अनेक प्रश्न मी विधिमंडळात मांडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने मागणी करत आलो. मात्र सत्ता नसल्याने व विरोधी पक्षाचा आमदार असल्याने तो उपलब्ध झाला नाही .त्यामुळे अनेक विकासकांना खीळ बसली. तालुक्यातील पाणीप्रश्न कायम असून टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. गावागावातील रस्ते आजही हवे तसे पाहायला मिळत नाहीत.- पांडुरंग बरोरा, आमदारवचनांचं काय झालं?

  • पाणीटंचाई आजही कायम
  • बेरोजगारीचा प्रश्न प्रलंबित
  • रस्त्यांची अवस्था बिकट
  • बिगर आदिवासींचा प्रश्न
  • डम्पिंगचा प्रश्न सुटलेला नाही

पाण्याची समस्याआज तालुक्यात पाण्याची समस्या कायम आहे. ती सोडविण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येतात. हा काही त्यावरील उपाय नाही. ती कायमची सुटली पाहिजे. तालुक्यात तीन मोठी धरणे होऊनही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही कायम आहेत. - राजेंद्र विशेरोजगारीचा प्रश्न ही मोठी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी उपाययोजना झाली नाही. केवळ रोजंदारीवरील कामासाठी तरूणांची नियुक्ती म्हणजे रोजगार उपलब्ध केला असे नाही. रु ग्णांना सुविधा मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे. - माधव भेरेहे घडलंय...

  • गावागावातील रस्ते शहरास जोडले
  • भावली धरणातील पाण्यासाठी प्रयत्न
  • एमआयडीसी आणण्याचे काम केले.
  • नवीन बस डेपोच्या कामास मंजुरी
  • रु ग्णालयात आवश्यक विभाग वाढविण्यावर भर

हे बिघडलंय...

  • रस्त्यांची कामे निकृष्ट
  • पाणीयोजना अपूर्ण
  • कंपन्या असूनही स्थानिकांना बाहेर जावे लागते
  • उच्चशिक्षण घेऊनही तरु णांना काम नाही

का सुटले नाहीत प्रश्न?भावली धरणातून तालुक्याला पाणी मिळावे हा प्रश्न मीच सोडवला. याचे श्रेय भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी घेतले. दोघांमध्ये श्रेयवाद रंगला. ज्या पद्धतीने मागणी करण्यात आली होती त्यानुसार निधी उपलब्ध झाला नसल्याचे सांगण्यात आले. मागील दहा वर्षांपासून सुरू असणारी बिरवाडी सिंचन योजना ८ कोटी ७५ हजारावरून १९ कोटी ४५ हजारांवर जाऊनही आजपर्यंत पूर्णत्वाला आलेली नाही.परिणामी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.पाच वर्षांत काय केलं?तालुक्यात खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे .मात्र त्यासाठीच्या सुविधा असणे गरजेचे असतानाही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. तालुक्याला एक क्र ीडासंकुल असावे यासाठी खर्डी येथील जागा उपलब्ध करून दिली असली तरी त्यासाठी लागणारा निधी आजपर्यंत उपलब्ध करून देता आला नाही. त्यामुळे ती घोषणाच राहिली. यामुळे तालुक्यात चांगले खेळाडू असले तरी केवळ सुविधांअभावी त्यांना तालुक्याबाहेर प्रशिक्षणासाठी जावे लागत असल्याबद्द नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसshahapur-acशहापूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019