शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या

By जितेंद्र कालेकर | Updated: September 25, 2024 06:49 IST

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांची मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार

ठाणे : अक्षय शिंदेला चौकशीसाठी नेण्यात येत असताना तो अचानक प्रक्षुब्ध झाला. त्यामुळे पोलिसांनी गाडी थांबविली, त्याला पाणी दिले आणि त्याच्या हाताची बेडी काढली. बेडी काढल्याची संधी साधत त्याने पोलिस अधिकारी नीलेश मोरे यांचे पिस्तूल खेचले आणि त्याने पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या, असा तपशील गोळीबार करणारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीमध्ये नमूद केला आहे.

तपास पथकातील मोरे यांच्यासह पोलिस हवालदार अभिजित मोरे, हवालदार हरिश तावडे आणि निरीक्षक संजय शिंदे सोमवारी सायंकाळी ५:३०च्या सुमारास तळोजा मध्यवर्ती कारागृहातून पोलिस व्हॅनने ठाणे गुन्हे शाखेकडे निघाले होते. शिंदे चालकाच्या शेजारी बसले होते. एपीआय मोरे आणि दोन अंमलदार हे अक्षयसह मागे बसले होते. तुम्ही मला पुन्हा का घेऊन जात आहात? आता मी काय केले आहे? असे संतापून अक्षय पोलिसांना विचारत होता. एका क्षणी अक्षय प्रक्षुब्ध झाला, तो शिवीगाळ करत असल्याचे चालकासोबत बसलेल्या शिंदे यांना मागच्या पथकाने फोन करून सांगितले. त्यामुळे वाहन थांबवून  त्याला पाणी देत शांत करण्यासाठी वाहन रस्त्याच्या कडेला थांबविण्यात आले. आरोपीच्या समोर बसलेल्या तावडे यांच्या बाजूला शिंदे बसले. त्यांच्यासमोर एपीआय मोरे आणि हवालदार मोरे बसले होते. या दोघांमध्ये बसलेला अक्षयने पाणी प्यायल्यावर त्याच्या हातातील बेडी पोलिसांनी काढली. नेमकी हीच संधी साधत त्याने एपीआय मोरे यांचे सर्व्हिस पिस्तूल हिसकावले. मला घरी जाऊ द्या, असे म्हणत त्याने पिस्तूल लोड केले. त्याने एक राऊंड मोरेंच्या दिशेने फायर केला. गोळी मोरे यांच्या मांडीमधून आरपार गेली आणि ते खाली कोसळले. त्यानंतर अक्षय आरडाओरडा करू लागला. ‘मला कधी सोडणार’ असे विचारत त्याने तावडे यांच्या दिशेने पिस्तूल रोखत दोन गोळ्या  झाडल्या. 

सुदैवाने, त्यातील एकही गोळी लागली नाही. अक्षयचा रूद्रावतार पाहून, तसेच तो आणखी गोळ्या झाडण्याच्या तयारीत असतानाच शिंदे यांनी एकच गोळी त्याच्या वर्मी मारली. गोळी लागताच अक्षय खाली कोसळला... हा सर्व तपशील शिंदे यांनी तक्रारीत विस्ताराने नमूद केला आहे.

अनुत्तरित प्रश्नाचे उत्तर

अक्षयचे हात बेड्यांमध्ये जखडलेले असताना त्याने पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल खेचून गोळ्या कशा झाडल्या, असा प्रश्न माध्यमांनी उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीतून उत्तर मिळू शकते, असे मानले जाते. 

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस