शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दिखाऊ आणि बेगडी (अ) स्वच्छ भारत अभियान!, जागोजागी कच-याचे ढीग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर स्वच्छ भारत अभियानाची घोषणा तीन वर्षांपूर्वी केली आणि अनेक नेताजींना त्या योजनेतही पैसा दिसला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर स्वच्छ भारत अभियानाची घोषणा तीन वर्षांपूर्वी केली आणि अनेक नेताजींना त्या योजनेतही पैसा दिसला. स्वच्छतेच्या नावावार तिजोरीवर डल्ला मारण्याची स्वप्ने त्यांना पडली, ती किती खरी होती हेच कोट्यवधी रूपयांचा चुराडा केल्यानंतरच्या तीन वर्षांच्या काळात दिसून आले. आताही गला पंधरवडाभर स्वच्छता हीच सेवा असल्याचे सांगत नसलेला कचरा काढण्यासाठी नेते, अधिकारी रस्त्यावर उतरले. पण त्यानंतरही त्यांच्या मोहीमेचा परीघ वगळता सर्वत्र कचºयाचे साम्राज्य आहे. प्लास्टिकचा खच आहे. अस्वच्छता आहे, दुर्गंधी आहे.गेल्या तीन वर्षांत भारत स्वाच्छ करण्यासाठी, महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी आणि ओघानेच ठाणे जिल्हा, त्यातील महापालिका, नगरपालिका स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ््या नावाने मोहीमा हाती घेण्यात आल्या. त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून जाहिरात, बॅनरबाजी करण्यात आली आणि त्यातून उभी राहिली, भ्रष्टाचाराची नवीन दुकानदारी. पांढरे स्वच्छ कपडे घालून, हातात झाडू घेऊन रस्ते साफ करत असल्याची छायाचित्रे नेत्यांनी छापून घेतली. ते वाहिन्यांवर झळकले. राजकीय मंडळींबरोबर अधिकाºयांनीही प्रसिद्धीची हौस भागवली. रस्त्यात कागदाचे चार तुकडे किंवा झाडांची पाने टाकून स्वच्छता मोहीम राबवल्याचे रेकॉर्ड तयार केले. पण या काळात एकही नेता कचराकुंड्यांच्या ठिकाणी किंवा डम्पिंग ग्राउंडवर गेला नाही. त्यामुळे त्यांना अस्वच्छता दिसलीच नाही. तेथील सफाई कामगार कुठल्या परिस्थितीत काम करतात तेही त्यांनी उघड्या डोळ््यांनी पाहिले नाही. ज्या संस्था, संघटना कोणतीही प्रसिद्धी न मिळवता वर्षानुवर्षे स्वच्छतेसाठी झटत आहेत. त्यांना या मोहिमेची गरज नव्हती आणि झगमगाटाचीही.आताही गेल्या १५ दिवसांपासून ‘स्वच्छता हीच सेवा’ नावाने मोहीम राबवली गेली. लांब दांड्याचे झाडू घेऊन फोटो काढले. कचरा काढायचा असेल तर कमरेतून वाकावे लागते, हे गाडगेबाबांनीच सांगून ठेवले होते, हेही कदाचित नेते, अधिकाºयांना माहीत नसेल. अशी ती खडी मोहीम अंमलात आली. कधी कुणापुढे झुकण्याची, वाकण्याची त्यांना सवयच नसल्याचे यातून दिसून आले. ही मोहीम राबवतानाही वेगवेगळ््या शहरांमध्ये ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले होते. ओला-सुका, प्लास्टिकचा कचरा, ई-कचरा, मेडिकल वेस्ट तसेच पडून आहे. कचºयाचे वर्गीकरण, डम्पिंग ग्राउंडच्या नावाने बोंब आहे. या सुविधांना प्राधान्य देत त्याची अंमलबजावणी करावी अशी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीच गेल्या तीन वर्षांत दिसली नाही. शहरातील कचºयाचा प्रश्न कायमस्वरूपी कसा सुटेल, यावर भर द्यावासा वाटला नाही. कारण कचरा हीच संपत्ती आहे. तेच भ्रष्टाचाराचे कुरण आहे. ती कमी होणे कुणालाच नको आहे. हा प्रश्न निकाली निघाल्यास कचºयातून सोन्याचा धूर कसा काढणार, ही चिंता असल्याने ठाणे जिल्ह्यात जागोजागी स्वच्छ भारत अभियान फसल्याचेच चित्र दिसून आले.गांधीजयंतीचा मुहूर्तया गांधीजयंतीच्या मुहूर्तावर सोमवारी पुन्हा स्वच्छतेच्या प्रश्नाला हात घातला जाईल. नेते- अधिकारी मिरवतील. गांधींसह वेगवेगळ््या नेत्यांची स्वच्छतेची वचने उद्धृत केली जातील. ओला-सुका वेगळा करण्यासाठी नागरिकांना साद घातली जाईल. पण संध्याकाळपर्यंत त्या घोषणा पुन्हा विरून जातील आणि नाले-गटारे कचºयाने भरतील. कचराकुंड्या ओसंडून वाहतील. आधीच खच्चून भरलेली, क्षमता संपलेली डम्पिंग ग्राऊंड आणखी कचºयाने लगडून जातील. स्वच्छतेच्या नावाने आणखी एक दिवस बरबटून निघेल.कचरा उचलण्यात हयगयपालिकेचे अधिकारी, शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी जरी उत्साहाने कचरा काढण्याच्या, स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी झालेले असले तरी गोळा केलेला कचरा वेळेत उचलला जात नाही, असे दिसून येते. घंटागाड्यांच्या हव्यी तशा फेºया होत नाहीत. जेथे कचराकुंड्या आहेत, तेथे त्या ओसंडून वाहतात. कचरा पार रस्त्यावर येतो. दुर्गंधी सुटते, पालिकेच्या वॉर्ड आॅफिसात तक्रारी जातात पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही. कंत्राटदाराकडे बोट दाखवून मोकळे होतात. पण त्याला जाब विचारण्याची आपली जबाबदारी आहे हे विसरतात.ठाण्यात डम्पिंग प्रलंबितठाणे : स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेकडून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपाययोजना तीन वर्षापासून केल्या जात आहेत. परंतु आजही अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणे, उघड्यावर प्रातर्विधीस बसणे सुरुच आहे. डायघर प्रकल्पचा प्रश्नही आठ ते दहा वर्षापासून पालिकेला सोडवता आलेला नाही. त्यातही ओला आणि सुका कचरा वर्गीकरणात पालिकेला अपयशच आले आहे. प्लास्टीकच्या पिशव्यांवर कारवाई होऊनही त्या आजही विकल्या जात आहेत. त्यामुळेच स्वच्छ ठाणे प्रत्यक्षात केव्हा अंमलात येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. परंतु यामध्ये काही राजकीय मंडळींनी मात्र स्वच्छतेच्या नावाखाली केवळ सेल्फी काढण्यातच धन्यता म्हणा किंवा प्रसिध्दसाठी केलेला स्टंट हाही नाकारता येत नाही. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यातील काही योजना प्रत्यक्षात उतरल्या असून काही योजनांचे काम सुरु आहे. तर काही योजनांचे आजही कागदी घोडे नाचवले जात आहे. महापालिकेच्या माध्यमातून मागील १५ दिवसात पुन्हा स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. पहिल्या दोन वर्षात ज्या पध्दतीने मोहीमेचा गवगवा केला, निधी खर्च केला गेला तसा काही प्रकार यंदा दिसला नाही. त्यातही राजकीय मंडळींनीही मोहीमेकडे पाठच फिरवल्याचे दिसून आले. काहींनीतर केवळ सेल्फीपुरता हातात झाडू घेतला तर काहींनी सोशल मीडियावर प्रसिध्दी मिळवण्यासाठी स्वच्छतेचा खोटा जागर केल्याचे दिसले. एकूणच स्वच्छतेच्या नावाने चांगभलच झाल्याचे दिसून आले.दुसरीकडे हगणदारीमुक्तीकडे ठाणे महापालिकेने मागील तीन वर्षापासून पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. शहरात आजच्याघडीला सुमारे १५ हजारांच्या आसपास स्वच्छतागृहे आहेत. परंतु तरी देखील अनेक भागात उघड्यावर जाणाºयांची परपंरा कायम आहे. त्यामुळे पालिकेने मागील तीन वर्षात, सार्वजनिक ७५०० आणि वैयक्तिक १२०० सीटची स्वच्छतागृहे उभारली आहेत. परंतु जनजागृतीमध्ये पालिका कमी पडत असल्याने आजही हगणदारीमुक्तीपासून ठाण्याची सुटका झालेली नाही. प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबण्यामागे प्लास्टीक हे प्रमुख कारण पुढे येत असले तरी आजही राजरोसपणे शहरात अनेक ठिकाणी प्लास्टीक पिशव्यांचा वापर होत आहे.