अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 04:48 IST2017-08-15T04:48:40+5:302017-08-15T04:48:42+5:30

मुंब्य्रातील झुडुपामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया सतरा वर्षीय मुलाविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Sexual harassment on a minor girl | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

ठाणे : येथील एका रिक्षाचालकाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन मुंब्य्रातील झुडुपामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया सतरा वर्षीय मुलाविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या अल्पवयीन मुलीला एका मुलाने खारेगावच्या पारसिक लोकमंडल विद्यालय या ठिकाणी मे २०१७ मध्ये बोलवून घेतले. तिथून त्याच्या मोटारसायकलवर बसवून मुंब्रा येथील मोकळ्या जागेतील झुडुपांमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर, तुझ्या घरी या प्रकाराची माहिती देईल, अशी धमकी देत पुन्हा मोटारसायकलवर बसवून फिरायच्या बहाण्याने वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याने दिलेल्या धमकीमुळे तिने घरातही या प्रकाराची वाच्यता केली नाही. ८ आॅगस्ट २०१७ पर्यंत हा प्रकार सुरूच होता. पोटात दुखत असल्यामुळे तिला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात ८ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले. त्यानंतर, ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. पुढील उपचारासाठी तिला मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातूनच हा प्रकार थेट कळवा पोलिसांना कळवण्यात आला.
अखेर, याप्रकरणी मुलीच्या पालकांनी १३ आॅगस्ट २०१७ रोजी त्या मुलाविरुद्ध मुलीचे अपहरण करणे, लैंगिक अत्याचार करणे तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. संबंधित मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या पालकांना याबाबतची कल्पना देऊन त्याच्यावर कारवाईची नोटीस बजावली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक इरशाद सय्यद यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Sexual harassment on a minor girl