अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: April 19, 2017 00:31 IST2017-04-19T00:31:50+5:302017-04-19T00:31:50+5:30

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकास वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली.

Sexual harassment on a minor girl | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

ठाणे : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकास वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली.
संतोष श्यामसुंदर सावंत (वय २0) हे आरोपीचे नाव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील या युवकाने ५ एप्रिल रोजी ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील १६ वर्षीय कुमारिकेस फूस लावून पळवून नेले होते.
कुमारिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ६ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे एक पथक तपासकामी वैभववाडी येथे गेले. पोलिसांनी कुमारिकेस युवकालाही सोमवारी पोलीस ठाण्यात आणले. या काळात युवकाने चार ते पाच वेळा आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा जबाब कुमारिकेने पोलिसांजवळ नोंदविला. त्यानुसार भादंविचे कलम ३७६ तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याचे कलम ४,६,८ आणि १२ या गुन्ह्यामध्ये वाढविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Sexual harassment on a minor girl