शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार: पोलिसाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 23:36 IST

फेसबुकवर मैत्रि झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील कपिल भोईर (२४) या पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध बुधवारी रात्री नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार फेसबुकद्वारे झाली होती मैत्रीआॅगस्ट २०१८ ते मे २०१९ या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये अत्याचार केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाºया ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील कपिल भोईर (२४) या पोलीस शिपायाविरुद्ध बुधवारी रात्री नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरूअसल्याचे पोलिसांनी सांगितले.नवी मुंबईतील नेरूळ येथे राहणारी ही पीडित तरुणी आणि २४ वर्षीय कपिल हे दोघेही कल्याण येथील एका खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जात होते. तिथेच या दोघांची ओळख झाली. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांच्यात २०१७ पासून चांगली मैत्री झाली. याच मैत्रीतून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. आॅगस्ट २०१८ ते मे २०१९ या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये ते दोघेही बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यातील उपवन आदी भागांत फिरले. दरम्यान, लग्न होणार असल्यामुळे या दोघांमध्ये शारीरिकसंबंधही आले. दरम्यानच्याच काळात, ठाणे शहर पोलीस दलात भरती झाल्यामुळे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस मुख्यालयात त्याला नियुक्ती मिळाली. मात्र, ती पोलीस भरती होऊ शकली नाही. तिने त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह धरल्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला. घरातील कुटुंबीय स्वीकारणार नाहीत. लग्नास मान्यता देणार नाहीत, अशा सबबी सांगून त्याने तिच्याशी लग्नास असमर्थता दर्शवली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या पीडित तरुणीने अखेर २७ नोव्हेंबर २०१९ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार करणे, शिवीगाळ करणे आणि धमकी दिल्याप्रकरणी आरोपी पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या इच्छेविरुद्ध त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार