शहापूर-मुरबाडच्या ७८ गावपाड्यांत तीव्र टंचाई
By Admin | Updated: May 9, 2017 00:59 IST2017-05-09T00:59:52+5:302017-05-09T00:59:52+5:30
सतत वाढणारे तापमान, त्यात पाण्याच्या जीवघेण्या टंचाईला ठाणे जिल्ह्याच्या शहापूर व मुरबाड तालुक्यांतील ७८ गावपाडे तोंड देत आहेत.

शहापूर-मुरबाडच्या ७८ गावपाड्यांत तीव्र टंचाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सतत वाढणारे तापमान, त्यात पाण्याच्या जीवघेण्या टंचाईला ठाणे जिल्ह्याच्या शहापूर व मुरबाड तालुक्यांतील ७८ गावपाडे तोंड देत आहेत. या प्रशासनाकडून गावपाड्यांना १८ टँकरने पाणी पुरवले जात असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.
जिल्ह्याच्या सात तालुक्यांपैकी सद्य:स्थितीला शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांतील गावांत तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. यामध्ये मुरबाडच्या दोन गावांसह दोन आदिवासी पाड्यांचा समावेश आहे. या चार गावपा्यांच्या पाणीपुरवठ्यासाठी तीन टँकर सुरू केले आहेत. याशिवाय, सर्वाधिक टंचाई असलेल्या शहापूर तालुक्यामध्ये १६ मोठी गावे व ५८ आदिवासी पाडे पाणीटंचाईला तोंड देत आहेत. या७४ गावपाड्यांसाठी १५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
सध्या सुरू असलेल्या या उन्हामुळे पाण्याची पाणी खोल जाऊन विहिरी व बोअरवेलने होणारा पाणीपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांच्या संख्येत आगामी १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. गावांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित गावकरी, सरपंच आदींनी तत्काळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांच्याकडे टँकरची मागणी करणे अपेक्षित आहे.