ठाणे : अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाण्यात शिंदेसेनेचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात सहा महिला आणि एका पुरुष उमेदवाराचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सातही उमेदवार शिंदे यांचे निकवर्तीय मानले जात आहेत.ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सुरुवातीला १,१०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत ९९ अर्ज बाद झाले, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी २ जानेवारीला अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने वागळे इस्टेट आणि वर्तकनगर भागात शिंदेसेनेचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. हे सर्व उमेदवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील आहेत. काही इतर प्रभागांमध्येही बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्या ठिकाणी शिंदेसेनेला अपेक्षित यश मिळू शकले नाही.प्रभाग क्रमांक १८ मधून जयश्री फाटक, सुखदा मोरे आणि राम रेपाळे हे तिघे बिनविरोध निवडून आले. या प्रभागातील पॅनलमधील उमेदवार नीलेश लोहाटे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यात यश आले नाही. त्यामुळे या प्रभागातील दीपक वेतकर यांची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही.हे उमेदवारही आले बिनविरोध निवडूनदरम्यान, सावरकरनगरमधील प्रभाग क्रमांक १४ मध्ये राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) अरुणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर मनसेच्या रेश्मा चौधरी यांचा अर्ज बाद झाला. परिणामी शिंदेसेनेच्या शीतल ढमाले या बिनविरोध निवडून आल्या. किसननगरमधील प्रभाग क्रमांक १७ मधून एकता भोईर, वर्तकनगर येथील प्रभाग क्रमांक ५ मधून जयश्री डेव्हिड आणि सुलेखा चव्हाण बिनविरोध निवडून आल्या.
Web Summary : Seven Shinde Sena candidates, including six women, were elected unopposed in Thane as rivals withdrew before the municipal elections. These candidates are close to Chief Minister Eknath Shinde and Minister Pratap Sarnaik. Efforts to achieve uncontested wins in other wards were unsuccessful.
Web Summary : ठाणे में शिंदे सेना के सात उम्मीदवार, जिनमें छह महिलाएं शामिल हैं, नगर निगम चुनाव से पहले प्रतिद्वंद्वियों के हटने से निर्विरोध निर्वाचित हुए। ये उम्मीदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और मंत्री प्रताप सरनाईक के करीबी हैं। अन्य वार्डों में निर्विरोध जीत हासिल करने के प्रयास विफल रहे।