शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

खारफुटीजवळील सात इमारती ‘जैसे-थे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 05:52 IST

दिवा रेल्वे स्थानकाजवळील खारफुटी भूखंडालगत असलेल्या सात अनधिकृत इमारतींवर ‘जैसे-थे’ ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेला गुुरुवारी दिले.

मुंबई : दिवा रेल्वे स्थानकाजवळील खारफुटी भूखंडालगत असलेल्या सात अनधिकृत इमारतींवर ‘जैसे-थे’ ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयानेठाणे महानगरपालिकेला गुुरुवारी दिले. उच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे २६२ कुटुंबांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.दिवा (प.) रेल्वे स्थानकालगत असलेल्या खारफुटींची कत्तल करून त्यावर बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले. ठाणे पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी दखल न घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते जनार्दन जयस्वाल यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे होती.या याचिकेवर आॅगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने महापालिकेला संबंधित बांधकामांची पाहणी करून कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशाचे पालन करत ठामपाने संबंधित इमारतींना भेट दिली व या इमारती खारफुटींची कत्तल करून त्या जागी बांधण्यात आल्या नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. ठामपातर्फे ज्येष्ठ वकील एस.जी. गोरवाडकर व जगदीश रेड्डी यांनी खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले. प्रतिज्ञापत्रानुसार, या इमारती अनधिकृतपणे उभारल्या आहेत. या इमारतींना पालिकेने कोणतीही परवानगी दिलेली नाही. मात्र, ही बांधकामे अनधिकृत असल्याने संबंधितांना जागा खाली करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली आहे.दरम्यान, दिवा येथील कुणाल कुंज इमारतीमधील रहिवाशांनी महापालिकेच्या नोटिसीला उच्च न्यायालायत आव्हान दिले आहे. पालिकेने सुनावणी न घेताच घर खाली करण्यास सांगितले आहे. तसेच पालिकेकडून आपल्या इमारतीसाठी सर्व परवानग्या मिळाल्याचा युक्तिवाद रहिवाशांतर्फे न्यायालयात केला गेला.त्यावर महापालिकेच्या वकिलांनी संबंधित इमारतींना एकही परवानगी दिली नसल्याचे सांगितले. याचा अर्थ मालकाने बनावट कागदपत्रे दाखवून लोकांना फसविले. मात्र, फ्लॅट खरेदी करणाऱ्यांनीही महापालिकेकडे याबाबत चौकशी करूनच फ्लॅट विकत घ्यायला हवा होता. यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांचाही दोष आहे. अनधिकृत इमारती बांधण्यास ते परवानगी देतात कसे? इमारती बांधून पूर्ण होतात तरी त्याकडे कोणत्याही अधिकाºयाचे लक्ष कसे जात नाही? अशा दोषी अधिकाºयांवर पालिका काय कारवाई करणार? असे सवाल करीत खंडपीठाने या सातही इमारती चार आठवड्यांसाठी ‘जैसे-थे’ ठेवण्याचे निर्देश महापालिकेला दिले.अद्याप पोलिसांची मदत नाहीच‘या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी गेले असता, सुमारे २ हजार नागरिकांनी दिवा रेल्वे स्थानकावर आंदोलन केले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. परिस्थिती विचारात घेऊन पालिकेच्या अधिकाºयांनी कारवाई न करताच माघार घेतली. मात्र, पुढील कारवाईसाठी पोलिसांकडून मदत मागितली. परंतु, पोलिसांनी अद्याप मदत केलेली नाही,’ असे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणे