शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात वाहने जाळण्याचे सत्र सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:22 IST

ठाणे शहरातील वाहनांना आगी लागण्याचे प्रकार अद्याप सुरुच आहेत. शुक्रवारी पहाटे देखिल लोकमान्यनगर येथील दोन मोटारसायकलींना आगी लागल्या. ही आग लागली की, लावण्यात आली, याचा तपास करण्यात येत असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देलोकमान्यनगरच्या दोन मोटारसायकलींना लावली आगआपत्ती व्यवस्थापन विभागाने आणले आगीवर नियंत्रणवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: शहरात वाहनांना लागी लागण्याचे सत्र सुरुच असून लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार येथील दत्तकृपा चाळीजवळ प्रकाश अकोलकर आणि दीपक गुप्ता यांच्या मोटारसायकलींना आगी लावल्याची घटना शुक्र वारी पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणल्याची माहिती सूत्रांनी दिली.लोकमान्य नगर पाडा क्र मांक चार मध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या अकोलकर आणि गुप्ता यांच्या दुचाकींनी अचानक पेट घेतला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणण्यात आली. जळालेल्या दुचाकीपैकी एका दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही आगी लागली की लावण्यात आली, याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या वर्षभरात वागळे इस्टेट, कासारवडवली, कोपरी, नौपाडा अशा विविध भागांमध्ये मोटारसायकल तसेच वाहनांना आगी लावण्याच्या दहा ते १२ घटना घडल्या आहेत. त्यात शुक्रवारी पुन्हा आणखी एक घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfireआग