ज्येष्ठ वारकरी संतु वाघुले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:13 IST2021-03-13T05:13:05+5:302021-03-13T05:13:05+5:30

ठाणे : ठाण्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ वारकरी संतु मारुती वाघुले यांचे गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले. ...

Senior Warkari Santu Waghule passes away | ज्येष्ठ वारकरी संतु वाघुले यांचे निधन

ज्येष्ठ वारकरी संतु वाघुले यांचे निधन

ठाणे : ठाण्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ वारकरी संतु मारुती वाघुले यांचे गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८४ होते. गेले दोन महिने वृद्धापकाळाने त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांची अंत्ययात्रा सकाळी ९ वाजता नौपाडा येथील त्यांच्या निवासस्थानातून निघाली आणि ठाणे पूर्व कोपरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांचे ते वडील होते.

मूळचे खेड - राजगुरूनगर येथील वरुड गावचे असलेले संतू मारुती वाघुले १९५० साली ठाणे येथे दादा पाटील वाडी येथे आले. एका खाजगी कंपनीत दीर्घकाळ नोकरी करताना वारकरी उपक्रमात सक्रिय होते. आळंदी येथील संस्थेत ते कार्यरत होते. १९६९ ते २०१९ पर्यंत सलग पन्नास वर्षे नियमितपणे आळंदी आणि पंढरपूर येथे त्यांचे आवर्जून जाणे होते. दादा पाटील वाडी येथे होणाऱ्या सप्ताहाच्या आयोजनात ते आघाडीवर होते.

Web Title: Senior Warkari Santu Waghule passes away