ज्येष्ठ पत्रकार मधुकर उपासनी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:46 IST2021-09-05T04:46:45+5:302021-09-05T04:46:45+5:30

डोंबिवली : ज्येष्ठ आणि ऋषितुल्य पत्रकार, अध्यात्माचे उपासक मधुकर श्रीधर उपासनी (वय ७७) यांचे शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता डोंबिवली ...

Senior journalist Madhukar Upasani passes away | ज्येष्ठ पत्रकार मधुकर उपासनी यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार मधुकर उपासनी यांचे निधन

डोंबिवली : ज्येष्ठ आणि ऋषितुल्य पत्रकार, अध्यात्माचे उपासक मधुकर श्रीधर उपासनी (वय ७७) यांचे शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता डोंबिवली येथील त्यांच्या निवासस्थानी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून उपासनी यांच्यावर रेडिएशन, केमोथेरपी उपचार सुरू होते. परंतु, उपचारांना तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांना चिरंजीव मनीष यांनी घरी आणले होते. सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्यांचे निधन झाले. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी पत्रकारितेत झोकून दिले होते. अध्यात्माची त्यांना प्रचंड आवड होती. वसंतराव त्रिवेदी, जगदीश दामले, दामूभाई ठक्कर, विजय वैद्य, कृ. वि. तथा नाना पेठे, भय्यासाहेब सहस्रबुद्धे, राजाराम माने यांच्यासह अनेकांबरोबर त्यांनी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे उत्तम कार्य केले. गेल्या काही वर्षांपासून गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन, दैनंदिन पंचांग यांचा त्यांनी अनेकांना पुरवठा करून सर्वांना प्रतीक्षा करायला लावली होती. त्यांच्या निधनाने पत्रकारितेतील ऋषितुल्य मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

----------

Web Title: Senior journalist Madhukar Upasani passes away