ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत

By Admin | Updated: March 25, 2017 01:23 IST2017-03-25T01:23:28+5:302017-03-25T01:23:28+5:30

ठाणे परिवहनच्या बसगाड्यांत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत

Senior citizens, students get 50% discount | ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत

ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत

ठाणे : ठाणे परिवहनच्या बसगाड्यांत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची, दिव्यांगांना मोफत प्रवासाची सवलत देण्याची, परिवहनची वेबसाइट सुरू करण्याची, ‘तेजस्विनी’च्या ५०, इलेक्ट्रीक १०० आणि इथेनॉइलच्या १०० बसची खरेदी करण्याची तरतूद असलेला २६८ कोटी २२ लाखांचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला.
यंदाच्या अर्थसंकल्पात ११० कोटींची वाढ आहे. परिवहनला ६५ कोटींची तूट अपेक्षित असली, तरी पालिकेकडून मिळणारे अनुदान गृहीत धरल्याने अर्थसंकल्पात ही वाढ अपेक्षित आहे. ठाणे महापालिकेकडून ‘व्हिजन ठाणे’ अंतर्गत १३६.१३ कोटी आणि २०१७-१८ साठी ७० कोटी मिळून २१२ कोटी ४६ लाखांच्या अनुदानाची मागणी केली आहे. हे १२२.८३ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. परिवहन सदस्यांच्या संख्येअभावी गेल्यावर्षी अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर होऊ शकला नव्हता. यंदा प्रशासनाने तो वेळेत सादर केला आहे. व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी परिवहन सभापती दशरथ यादव यांना तो सादर केला. (प्रतिनिधी)
सवलतींचा भार वाढणार-
महापालिका हद्दीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी २० टक्के सवलत दिली जात होती. परंतु, ही सूट मासिक पास घेतल्यास उपलब्ध होत होती. त्यामुळे या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना घेता येत नव्हता. आता ५० टक्के सवलत देण्याचे प्रस्तावित केले आहे. विद्यार्थ्यांनाही ५० टक्के सूट दिली आहे. यातून, परिवहनवर १ कोटी ३२ लाखांचा भार वाढणार आहे. हा भार महापालिकेच्या अनुदानातून भरून निघेल, अशी अपेक्षा आहे.
ठाणे परिवहन सेवेची वेबसाइट
ठाणे परिवहन सेवेने आपली वेबसाइट ३े३४ं३.३ँंल्लीू्र३८.ॅङ्म५.्रल्ल कार्यान्वित केली आहे. या वेबसाइटमुळे ठाणे परिवहन सेवेच्या विविध विभागांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहे. तसेच प्रवाशांना या वेबसाइटमुळे त्यांच्या तक्रारी व सूचना थेट प्रशासनाकडे मांडता येणार आहेत.
‘तेजस्विनी’ महिला टीसी
महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ‘तेजस्विनी’ बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी ५० बसेस खरेदी केल्या जाणार आहे. याकरिता, महिला प्रशिक्षित चालक आणि वाहकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यंदा या बससाठी महिला टीसींची नियुक्ती करण्यात येणार आहे.
चेहरा बदलणार
परिवहनचा ढिसाळ कारभार सुधारण्यासाठी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वत: लक्ष केंद्रित केले असून ‘ठामपा व्हिजन’ तयार करण्यात आले आहे.

Web Title: Senior citizens, students get 50% discount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.