मराठी भाषा वापराबाबत कौटुंबिक न्यायालयात परिसंवाद

By Admin | Updated: January 25, 2017 04:39 IST2017-01-25T04:39:08+5:302017-01-25T04:39:08+5:30

न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा प्रभावी वापर कसा करता येईल, या विषयावर ठाण्यातील जिल्हा कौटुंबिक न्यायालयात एक परिसंवादात्मक कार्यक्रम पार पडला.

Seminar in Family Court on Use of Marathi Language | मराठी भाषा वापराबाबत कौटुंबिक न्यायालयात परिसंवाद

मराठी भाषा वापराबाबत कौटुंबिक न्यायालयात परिसंवाद

ठाणे : न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा प्रभावी वापर कसा करता येईल, या विषयावर ठाण्यातील जिल्हा कौटुंबिक न्यायालयात एक परिसंवादात्मक कार्यक्रम पार पडला. या वेळी मान्यवर वकिलांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
न्यायालयात मराठी भाषेची आवश्यकता कशी आहे, हे प्रा. मुंढे यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याचबरोबर त्यात अडीअडचणीही आहे. त्यातच कायद्याची मराठी भाषेतील पुस्तके कमी आहेत. परंतु, ज्येष्ठ वकिलांनी व न्यायाधीशांनी कायद्यावरील पुस्तके मराठी भाषेत लिहावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. हे कौटुंबिक न्यायालय असल्याने येथे पक्षकारांना आपल्या भावना मातृभाषेचा चांगल्या प्रकारे व प्रभावीपणे वापर करून मांडता येतात. त्यामुळे मराठी भाषेचा वापर केला, तर त्याचे संवर्धन करण्यासाठी आवाहन करण्याची गरज पडणार नाही, असे मत न्यायाधीश इंद्रकला नंदा यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Seminar in Family Court on Use of Marathi Language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.