उल्हासनगरात चायनीज हॉटेलवर बिअरची विक्री
By सदानंद नाईक | Updated: May 3, 2024 19:21 IST2024-05-03T19:21:42+5:302024-05-03T19:21:56+5:30
३२ बिअर बॉटल विक्री केल्याचे उघड झाले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

उल्हासनगरात चायनीज हॉटेलवर बिअरची विक्री
उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील चायनीज पदार्थ विक्री करणाऱ्या एका हॉटेल मध्ये बेकायदा बिअर बॉटल विक्री केल्या प्रकरणी संदीप रिजवान यांच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रिजवान यांनी ३२ बिअर बॉटल विक्री केल्याचे उघड झाले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथे चोपडास चिकन हॉटेल नावाचे चायनीज विक्रीचे दुकान आहे. चायनिस दुकानावर अवैधपणे बिअर बॉटलची विक्री होत असल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली होती. बुधवारी रात्री साडे अकरा वाजता पोलिसांनी धाड टाकली असता, हॉटेल मध्ये ३२ बिअर बॉटलची विक्री झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी हॉटेल मालक संदीप रिजवान याला ताब्यात घेऊन अवैधपणे बिअर बॉटल विक्री केल्याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.