सेल्फीच्या नादात रेल्वेखाली जीव गमावला
By Admin | Updated: November 12, 2016 06:27 IST2016-11-12T06:27:34+5:302016-11-12T06:27:34+5:30
रेल्वे रुळांवर मोबाइलने सेल्फी काढणाऱ्या मोहम्मद शब्बीर खान (वय १३, रा. न्यू वासी इमारत, नयानगर, मीरा रोड) याचा रेल्वेने दिलेल्या

सेल्फीच्या नादात रेल्वेखाली जीव गमावला
मीरा रोड : रेल्वे रुळांवर मोबाइलने सेल्फी काढणाऱ्या मोहम्मद शब्बीर खान (वय १३, रा. न्यू वासी
इमारत, नयानगर, मीरा रोड) याचा रेल्वेने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. मात्र, रेल्वे पोलिसांनी मृताची ओळख न पटल्याने बेवारस म्हणून ठेवला होता.
आठवीत शिकणाऱ्या मोहम्मदला वडिलांनी वाढदिवसाला मोबाइल
भेट दिला होता. त्यामुळे आनंदात असलेल्या मोहम्मदने मित्रांसोबत मीरा रोडला रेल्वेमार्गालगत असलेल्या ‘जॉगर्स पार्क’ येथे फोटो काढण्याचे ठरवले होते. दोघेही फोटो काढण्यासाठी घरून निघाले. पण, वाटेत त्यांचा बेत बदलला. ते
रेल्वे मार्गावर सेल्फी काढण्यासाठी गेले. तेथे भरधाव मेलच्या धडकेत मोहम्मदचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे घाबरलेला मित्र पळून गेला.
मोहम्मद घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. शेवटी, त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. दुसरीकडे रेल्वे पोलिसांनी मोहम्मदच्या मृतदेहाची ओळख न पटल्याने तो टेंबा रुग्णालयात बेवारस म्हणून ठेवला होता.
दरम्यान, नयानगर पोलिसांना शब्बीर यांच्या घराजवळ असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सापडले. त्यात मोहम्मद मित्रासोबत जाताना व २३ मिनिटांनी तोच मित्र एकटा धावत परतल्याचे दिसले. अखेर, पोलीस व शब्बीर यांनी त्या मित्राकडे विचारपूस केल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी लागलीच रेल्वे पोलिसांकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांनी टेंबा रुग्णालयातील मृतदेह दाखवला.