स्वखर्चाने परिसर स्वच्छ राखणारा स्वच्छतादूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 01:02 AM2020-02-02T01:02:49+5:302020-02-02T01:03:02+5:30

प्रेस बाजार ठेवतात नेहमी चकाचक

Self-cleaning sanitary area | स्वखर्चाने परिसर स्वच्छ राखणारा स्वच्छतादूत

स्वखर्चाने परिसर स्वच्छ राखणारा स्वच्छतादूत

Next

उल्हासनगर : केंद्र सरकारकडून स्वच्छता अभियान सुरू आहे. त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करावी लागत आहे. मात्र, उल्हासनगरमधील राजू तेलकर हे स्वत: पुढाकार करून आपल्या परिसराची स्वच्छता ठेवत आहेत. एकीकडे स्वच्छतेवर सरकारी पैशांची उधळपट्टी करून अनेकजण फोटोसेशन करत असताना तेलकर मात्र स्वखर्चाने स्वच्छतेचा आदर्श निर्माण करत असून ते आता उल्हासनगरमधील गाडगेबाबा म्हणून ओळखले जात आहेत.

शहरातील प्रेस बाजारात गाळा असलेल्या तेलकर हे हा परिसर स्वत: रंगरंगोटी करून स्वच्छ ठेवत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊ न राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरवले होते. स्वच्छता अभियानाच्या सर्वेक्षणाची शनिवारी शेवटची फेरी पार पडली. देशात पहिल्या ५० मध्ये येण्याचा मानस महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी व्यक्त केला. राजू तेलकर हे प्रेस बाजार स्वच्छ ठेवण्यासाठी झटत आहेत.

प्रेस बाजार परिसर इतर विभाग वेगळा ठरण्यासाठी तेलकर यांनी स्वखर्चाने बाजारातील सर्व दुकानांना एकच रंग दिला. तसेच दुकानाबाहेर मोठ्या कुंड्यांत विविध प्रकारचे झाडे लावून परिसर हिरवा केला आहे. मार्केट परिसरात कचरा दिसू नये म्हणून दुकानदारांना कचऱ्याचा डबा ठेवणे सक्तीचा करून दररोज सकाळ-संध्याकाळ कचरा उचलला जातो.

शहरातील प्रेस बाजारातील स्वच्छतेचे कौतुक तत्कालीन सर्वच आयुक्तांनी केले असून त्यांनी परिसराला भेट दिली. तुटलेल्या नाल्याचे निवेदन तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडे राजू तेलकर यांनी देताच, त्यांनी स्वत: प्रेस बाजाराला भेट देऊ न तेलकर यांच्या स्वच्छतेचे कौतुक केले. बाजारातील दुकानदारांचे व कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मध्यवर्ती रुग्णालय यांच्या मदतीने आरोग्य शिबिरासह विविध उपक्रम राबवण्याचे काम तेलकर करत आहेत.

पुरस्कारांनी भरले घर

राजू तेलकर यांच्या स्वच्छता व सामाजिक कामाची दखल राज्य शासनासह विविध सामाजिक संस्थेन घेतली. पुरस्कार चिन्हांनी त्याचे घर सजले असून १०० पेक्षा जास्त पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

Web Title: Self-cleaning sanitary area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.