शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

राज्यस्तरीय ‘आदर्श सामुहीक वन हक्क धारक गांव’ च्या गौरवासाठी शिसेवाडीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 6:42 PM

या राज्यस्तरीय गौरवासाठी आदिवासी विकास विभागाला संस्थेचे जिल्हा समन्वयक कपिल कर्पे यांनी हा प्रस्ताव बिनचूक पाठवला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या नामांकानांमधून शिरसेवाडीच्या सामुहिक वन हक्क व्यवस्थापनाचे उत्कृष्ट कार्य म्हणून शिसेवाडीची निवड झाली आहे. यामुळे या गावक-यांचे अभिनंदन होत आहे.

ठळक मुद्देआदिवासी विकास विभागाव्दारे हा गौरव नागपूर येथे हा कार्यक्रमजागतिक आदिवासी दिनाच्या निमित्त

ठाणे : सामुहिक वन हक्क मिळालेल्या मुरबाड तालुक्यातील शिसेवाडी या गावाचा ‘आदर्श सामुहिक वन हक्क धारक गाव’ म्हणून राज्यस्तरीय पातळीवर गौरव करण्यात येणार आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्त साधून आदिवासी विकास विभागाव्दारे हा गौरव होणार आहे. ९ आॅगस्ट रोजी नागपूर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.महाराष्ट्रातील गावांमधून क्षेत्रात आदिवासींसाठी सामुहिक दृष्ट्य उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांची या राज्यस्तरीय गौरवासाठी निवड केली जाते. यानुसार या शिरसेवाडीची ‘सामुहिक वन हक्क धारक गाव’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या राज्यस्तीय कार्यक्रमामध्ये उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती शिसेवाडी येथील गणपत मेंगाळ व नवसू वाघे यांना ग्रामसभेच्या वतीने गौरविण्यात येणार आहे.या गावातील ग्रामसभा वन निकेतन संस्था व श्रमिक मुक्ती संघटनेच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून आदिवासी गावकऱ्यांनी नियोजन पध्दतीने सामुहिक कार्य केले. या शिरसेवाडी गावकºयांनी सामुहिक वन क्षेत्राचा सूक्ष्म नियोजन पद्धतीने कृती आराखडा तयार करून वृक्ष लागवड केली आहे. जल व मृदा संधारण, वणवा प्रतिबंध तसेच गांव विकासाच्या योजना गावकरी राबवत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच वन विभाग यांच्या सहकार्य या गावक-यांनी या सामुहिक कार्यात सहभाग घेऊन यश मिळवल्याचे वन निकेतन संस्थेच्या अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी सांगितले.या राज्यस्तरीय गौरवासाठी आदिवासी विकास विभागाला संस्थेचे जिल्हा समन्वयक कपिल कर्पे यांनी हा प्रस्ताव बिनचूक पाठवला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या नामांकानांमधून शिरसेवाडीच्या सामुहिक वन हक्क व्यवस्थापनाचे उत्कृष्ट कार्य म्हणून शिसेवाडीची निवड झाली आहे. यामुळे या गावक-यांचे अभिनंदन होत आहे. जंगलाचे राजे असलेल्यांच्या गौरव करून ख-या अर्थाने जागतिक आदिवासी दिन साजरा होईल,असे प्रतिपादनही वन निकेतनच्या इंदवी तुळपुळे यांनी केले आहे

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी