शेलार यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब
By Admin | Updated: April 22, 2017 02:21 IST2017-04-22T02:21:00+5:302017-04-22T02:21:00+5:30
केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक-४६ च्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार स्नेहल ऊर्फ साई शिवाजी शेलार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी

शेलार यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब
डोंबिवली : केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक-४६ च्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार स्नेहल ऊर्फ साई शिवाजी शेलार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी देविदास टेकाळे आणि सहायक निवडणूक अधिकारी श्वेता सिंगासने यांनी शुक्रवारी दुपारी त्यांना प्रमाणपत्र दिले.
‘वडील शिवाजी शेलार यांची पोकळी भरून येणारी नाही. खंबाळपाडा परिसराचा विकास करून त्यांनी वेगळा ठसा उमटवला. या प्रभागात ९० फुटी रस्ता, गृहसंकुलांचा विकास, महापालिकेचे आरक्षण, स्वच्छता आदींवर त्यांनी भर दिला होता. मीही त्यावरच भर देणार आहे. नागरिकांमध्ये जशी त्यांची प्रतिमा होती, तोच वारसा कायम ठेवताना जनहिताची कामे पूर्ण करण्यावर भर देणार आहे. प्रभागात ९० फुटी रस्त्याबरोबर आणखी दोन रस्ते होणार आहेत. शिवाजी शेलार यांनीच त्यासाठी कोट्यवधींची मंजुरी तसेच अर्थसंकल्पात तरतूदही केली आहे. महापौर, स्थायीचे सभापती आणि आयुक्त यांच्याकडे त्यासंदर्भात पाठपुरावा करणार आहे’, असे साई शेलार ‘लोकमत’ला सांगितले.
बिनविरोध निवडून येण्यामध्ये वडिलांचे कार्यकर्ते, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, गंगाराम शेलार यांचे योगदान मोलाचे आहे. आई माजी नगरसेविका शिल्पा शेलार यांनीही मार्गदर्शन केल. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)