उल्हासनगर शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा सहसमन्वयक पदी निवड
By सदानंद नाईक | Updated: May 13, 2023 16:32 IST2023-05-13T16:31:49+5:302023-05-13T16:32:26+5:30
पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी त्यांची जिल्हा सहसमन्वयक पदी नियुक्ती केली.

उल्हासनगर शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा सहसमन्वयक पदी निवड
उल्हासनगर : शिवसेना शिंदे गटाच्या कल्याण जिल्हा सहसमन्वयक पदी धीरज ठाकूर यांची निवड करण्यात आली. ठाकूर यांनी यापूर्वी युवासेनेचे यशस्वी काम केले असून त्यांचा पक्ष वाढीला फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.
उल्हासनगरात शिवसेना वाढविण्यात धीरज ठाकूर यांचा हात राहिला असून त्यांचे वडील विनोद ठाकूर हे महापालिकेचे उपमहापौर पदी राहिले आहे. कट्टर शिवसैनिक असलेले धीरज ठाकूर यांनी युवासेना शहर अधिकारी पदी असतांना युवकात चैतन्य निर्माण केले होते. शिवसेनेचे दोन गट झाल्यावर त्यांनी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या सोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी त्यांची जिल्हा सहसमन्वयक पदी नियुक्ती केली. ठाकूर यांच्यामुळे पक्ष वाढण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. तसेच अनिल मराठे यांची विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आल्याची माहिती चौधरी यांनी दिली.