शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

किन्हवलीत कापलेली रोपे पावसात भिजली; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 02:43 IST

हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, कापणीच्या हंगामास झाली सुरूवात

- वसंत पानसरे किन्हवली: तालुक्यातील किन्हवली भागासह ग्रामीण भागात भात कापणीला शेतकऱ्यांनी सुरूवात केली. परंतु चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने कापलेली भात रोपे भिजून ती कुजण्याच्या अवस्थेत आहेत. हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याने शेतकरी धास्तावला आहे.

शहापूर तालुक्यात १४ हजार हेक्टर भू क्षेत्रात भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. या वर्षी तरी आपल्या पदरी विनासंकट भातपिके पडतील अशी अपेक्षा असताना ऐन सुगीच्या हंगामात पाऊस पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भातपिकाला पूरक असा पाऊस झाल्याने गेल्या कित्येक वर्षांत शेतकऱ्यांना बघायला मिळाले नव्हते असे दर्जेदार पीक आले होते.

सहा ते सात दिवस पावसाने उघडीप दिल्याने भात कापणीच्या हंगामास सुरूवात झाली होती. पेरणीपासून१२० ते १३० दिवसांनी पिकणाºया गरवा प्रकारच्या भाताच्या प्रजातीसाठी पाण्याची थोडीफार गरज असली तरी १०० ते ११० दिवसांनी पिकणाºया हलवार जातीसाठी पाणी गरजेचे नाही.

शेतकºयांनी सोसायटीचे कर्ज काढून बि-बियाणे व खते विकत आणून शेती लावली आहे. कापलेली भातरोपे डोळ््यादेखत पाण्यावर तरंगत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेले पिकही जाणार असल्याने गोड घासही कडू लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रशासकीय यंत्रणा कामात व्यस्त आहेत. यामुळे नुकसानीचे पंचनामे कोण करणार असा सवाल शेतकरी करत आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कृषी कार्यालयातील सर्व कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असून पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल देणे अशक्य आहे.- दिलीप कापडणीस, कृषी अधिकारी, शहापूर

सतत चार दिवस पडत असलेल्या पावसाने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. कापलेली रोपे भिजून पेंढा काळा पडेल व भाताचे दाणे कुजणार असल्याने निवडणुकीनंतर तरी पंचनामे व्हावेत.- मुकुंद गायकर, शेतकरी,चरीव

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस