शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या रोपवाटिकेतील रोपे गेली सुकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 00:15 IST

लागवडच केली नाही; वनविभागाचा भोंगळ कारभार, तीन लाख खर्च करून विविध जातींची २२ हजार रोपे केली होती तयार

शेणवा : राज्य सरकारच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून खर्च करून रोपवाटिकेत तयार करण्यात आलेल्या रोपांची वनविभागाने लागवडच केलेली नाही. रोपे पाण्याविना जागीच सुकून गेली असल्याने वनविभागाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.राज्य सरकारने २०१६-१७ मध्ये दोन कोटी, २०१७-१८ मध्ये चार कोटी व सन २०१८ - १९ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवडीचे धोरण अवलंबिले होते. यातील १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत रोपे लावण्यासाठी वनविभागाच्या शहापूर तालुक्यातील डोळखांब वन परिक्षेत्र अंतर्गत असणाऱ्या खराडे परिमंडळातील वेहलोली रोपवाटिकेत निवृत्त वनपाल पी.पी. पाटील यांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील तीन लाख खर्च करून प्रति हेक्टरी ११०० रोपांची लागवड याप्रमाणे २० हेक्टर क्षेत्रात लागवडीसाठी विविध जातींची २२ हजार रोपे तयार केली होती. यातील किमान चार ते पाच हजार रोपांची वनविभागाने लागवडच न केल्याने रोपे दुर्लक्षित रोपवाटिकेत पाण्याविना सुकून गेल्याने निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी हळहळ व्यक्त करीत आहेत.  नदीकिनारीच असणाऱ्या या रोपवाटिकेकडे वनविभागाचा एकही कर्मचारी साधा फिरकतही नाही.यावर्षी रोपवाटिकेसाठी वनविभागाकडून निधीच उपलब्ध नसल्याने रोपवाटिका बंद करण्यात आल्या आहेत.    - पी. के. थोरे, वनपालडोळखांब वनपरिक्षेत्र हद्दीतील साकुर्ली व वेहलोली येथे रोपवाटिका आहेत. निधीअभावी तसेच वृक्ष लागवडीचे यावर्षी लक्ष्यही नसल्याने वेहलोली येथील रोपवाटिका बंद करण्यात आली असून यावर्षी या रोपवाटिकेतील रोपे लावण्यात येतील.    - पी. आर. निकाळजे, वनपरिक्षेत्र     अधिकारी, डोळखांबरोपवाटिकेसाठी सरकारकडून निधी मंजूर नसल्याने तालुक्यातील रोपवाटिका बंद केल्या असून शहापूर नर्सरीत रोपे मोठ्या प्रमाणात असल्याने दुसरी रोपे तयार करण्याची आवश्यकता नाही. याच रोपांची लागवड यावर्षी करण्यात येणार आहे.    - बी. टी. घुले, उपवन संरक्षक, शहापूर