लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मोटारकारच्या धडकेत नितेश विनेरकर (३५, रा. कशेळी, भिवंडी ) हा मोटारसायकलवरुन जाणारा सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी कार चालक संजीवन मनाकारा (३६, रा. ऐरोली, नवी मुंबई) याच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भिवंडीतील रहिवाशी असलेले नितेश हे सुरक्षारक्षक ८ जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पातलीपाडा ब्रिजच्या खालून घोडबंदर रोडने जात होते. त्याचवेळी भरघाव वेगाने आलेल्या संजीवन मनाकारा यांच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात नितेश यांच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूला तसेच डाव्या पायाच्या टाचेच्या वर पायाचे हाड फ्रॅक्चर झाले. जखमी नितेश यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. चितळसर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पी. एन. शिंदे या अधिक तपास करीत आहेत.
मोटारकारच्या धडकेत मोटारसायकलवरील सुरक्षा रक्षक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 00:21 IST
मोटारकारच्या धडकेत नितेश विनेरकर (३५, रा. कशेळी, भिवंडी ) हा मोटारसायकलवरुन जाणारा सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. जखमी नितेश यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे
मोटारकारच्या धडकेत मोटारसायकलवरील सुरक्षा रक्षक गंभीर जखमी
ठळक मुद्दे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा