शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी गांभीर्याने कोरोनाचे नियम न पाळल्यास कलम १४४ ची अंमलबजावणी तीव्रपणे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 22:10 IST

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांंनी केले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा आढावा घेऊन कलम १४४ ची अंमलबजावणी तीव्रपणे केली जाणार आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांनी दिला इशारा विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांंनी केले आहे. रुग्णसंख्या अशीच वाढली तर मात्र सध्या लागू केलेल्या कलम १४४ ची अंमलबजावणी तीव्रपणे करणार असल्याचा इशाराही फणसळकर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिला.उपनगरी रेल्वे सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी काही वेळांकरीता सुरु झाल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येतही काही प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले आहे. त्याचबरोबर भाजी बाजार, रेल्वे स्थानक, बस स्थानक याठिकाणीही मोठी गर्दी वाढू लागली आहे. शिवाय, बस आणि रिक्षांमधूनही सर्रास जादा प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. ‘मास्कशिवाय, प्रवेश नाही’ असा फलक जरी बसवर असला तरी अनेक प्रवासी हे रिक्षा आणि बसमधून विना मास्क प्रवास करीत आहेत. नागरिकांमधील गांभीर्यता कमी होत असल्यामुळेच कोरोना हा साथीचा आजारही डोके वर काढत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा आढावा घेऊन कलम १४४ ची अंमलबजावणी तीव्रपणे केली जाणार आहे. सध्या या कलमानुसार पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास, जमा होण्यास बंदी आहे. पण, यामध्येही रेस्टॉरन्ट, बॅक्वेट हॉल अशा ठिकाणी शिथिलता आणली आहे. सध्या, सिनेमागृह, बॅक्वेट हॉल हे क्षमतेच्या ५० टक्के अनुमतीने सुरु केले आहेत. लग्न समारंभालाही १०० पेक्षा जास्त वºहाडी मंडळींना अनुमती नाही. या सर्व नियमांबरोबरच सामाजिक अंतर ठेवणे, मास्क लावणे आणि स्वच्छता हे नियम नागरिकांनी आवर्जून पाळण्याचे आवाहनही फणसळकर यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस