बेपत्ता मुलांचा लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:41 IST2021-03-31T04:41:24+5:302021-03-31T04:41:24+5:30

कल्याण : शहरातील कोळसेवाडी आणि खडकपाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात स्थानिक पोलिसांना यश ...

The search for the missing children began | बेपत्ता मुलांचा लागला शोध

बेपत्ता मुलांचा लागला शोध

कल्याण : शहरातील कोळसेवाडी आणि खडकपाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. पूर्वेतील विजयनगर परिसरात राहणारी १७ वर्षांची मुलगी सोमवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात ती हाजीमलंग रोड परिसरात राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीकडे आढळून आली. एक मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार शनिवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्याच्या मोबाइल फोनचे लोकेशन बघता तो पुण्यातील खडकी येथे असल्याचे उघडकीस आले. त्याचाही तत्परतेने शोध घेत त्याला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. तर तिसरी मुलगीही शनिवारीच बेपत्ता झाली होती. तिचाही मोबाइल लोकेशनवरून शोध घेतला असता ती कल्याण बस स्टॅण्ड परिसरातील एका लॉजवर असल्याचे समोर आले. या तिघांचा तत्परतेने शोध लावून त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

-----

Web Title: The search for the missing children began