कल्याणमधील रेल्वे हत्येप्रकरणातील आरोपीचा शोध सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST2021-07-09T04:25:41+5:302021-07-09T04:25:41+5:30
डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १ वर शनिवारी एका इसमाची हत्या करण्यात आली होती. त्या संशयित हत्येकऱ्यांचे ...

कल्याणमधील रेल्वे हत्येप्रकरणातील आरोपीचा शोध सुरूच
डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १ वर शनिवारी एका इसमाची हत्या करण्यात आली होती. त्या संशयित हत्येकऱ्यांचे सीसीटीव्ही फूटेज कल्याण लोहमार्ग पोलिसांना मिळाले आहे. मात्र अद्याप त्यांचा शोध लागत नसल्याने पोलीस यंत्रणा हैराण आहे.
त्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी तीन पथके तयार केली असून, अन्य यंत्रणांद्वारेदेखील शोधकार्य सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. शार्दुल म्हणाले. तो संशयित ज्या लोकलमध्ये बसला होता त्या दिशेने शोध घेणे सुरू आहे. पण, घटनेचा सुगावा लागलेला नाही. ती व्यक्ती नेमकी पुढे कुठपर्यंत गेली याचा शोध घेणे हे पोलीस यंत्रणेसमोर आव्हान आहे. ज्याची हत्या झाली त्याचेही वारसदार अजून सापडले नसल्याने समस्या वाढली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे टोपणनाव समजल्याचे सांगण्यात आले. पण, त्याची खरी ओळख पटत नसल्याने पोलीस यंत्रणा वारसाच्याही शोधात आहे.
--------------
वाचली.