जप्त मालमत्तांचा होणार लिलाव
By Admin | Updated: March 9, 2017 03:07 IST2017-03-09T03:07:47+5:302017-03-09T03:07:47+5:30
महापालिकेने जप्त केलेल्या २९ मालमत्तांचा लिलाव २१ मार्चला होणार आहे. लिलावाच्या एकूण रकमेच्या १० टक्के रक्कम भरून जागेचे मालक व्हा अशी आॅफर पालिकेने दिली आहे.

जप्त मालमत्तांचा होणार लिलाव
उल्हासनगर : महापालिकेने जप्त केलेल्या २९ मालमत्तांचा लिलाव २१ मार्चला होणार आहे. लिलावाच्या एकूण रकमेच्या १० टक्के रक्कम भरून जागेचे मालक व्हा अशी आॅफर पालिकेने दिली आहे. एप्रिल व मे महिन्यात २५० पेक्षा जास्त मालमत्तेचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती वसुली अधिकारी दादा पाटील यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेची मालमत्ता कर थकबाकी २८० कोटी पेक्षा जास्त आहे. पालिका आयुक्तांनी थकित मालमत्ता कर भरण्याचे आवाहन सुरुवातीला केले. मात्र आयुक्तांच्या आवाहना नंतर व नोटबंदीच्या काळात थकीत मालमत्ताधारकांनी सहकार्य केले नाही. फेबु्रवारीच्या अखेरपर्यंत फक्त ७६ कोटी कर स्वरूपात पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. सुरुवातीला पालिकेने एक हजारा पेक्षा जास्त थकित मालमत्ताधारकांना नोटीस दिल्या. त्यानंतर मालमत्ता जप्तीचा निर्णय घेतला. पालिकेने आतापर्यंत तब्बल ४०० पेक्षा जास्त थकित मालमत्ता जप्त केल्या असून त्यापैकी २९ मालमत्तेचा लिलाव २१ मार्चला केला जाणार आहे.(प्रतिनिधी)
१० टक्के रक्कम भरल्यास होणार मालमत्तेचा मालक
लिलावात भाग घेण्यासाठी २५ हजार पालिकेकडे भरावे लागणार आहे.
सर्वाधिक बोली लावणाऱ्यास त्वरित मालमत्तेचा ताबा देण्यात येणार आहे. तसेच लिलावाच्या १० टक्के रक्कम पालिकेकडे त्याच वेळी दिल्यास मालमत्तेचा मालक जाहीर करु असे पालिकेने कळविले आहे.
मालमत्ता कराची यावर्षाची थकबाकी ८० कोटी आहे.