थकबाकीदारांची बँक खाती होणार सील
By Admin | Updated: June 29, 2017 02:46 IST2017-06-29T02:46:38+5:302017-06-29T02:46:38+5:30
मागील काही महिन्यांपासून पालिका आयुक्त योगेश म्हसे यांनी थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली असून त्या अंतर्गत जास्त रकमेच्या

थकबाकीदारांची बँक खाती होणार सील
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : मागील काही महिन्यांपासून पालिका आयुक्त योगेश म्हसे यांनी थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली असून त्या अंतर्गत जास्त रकमेच्या १०० थकबाकीदारांना एलबीटी कर भरण्याची नोटीस पाठवली आहे.
शहरातील १०० मोठ्या व्यापाऱ्यांकडे सुमारे ४२ कोटीपेक्षा जास्त रकमेची थकबाकी असून ही थकबाकी भरण्यासाठी व्यापाऱ्यांना एलबीटी विभागामार्फत नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर या व्यापाऱ्यांची ज्या बँकेत खाती आहेत ती सील करण्याची शिफारस संबंधित बँक शाखेच्या व्यवस्थापकास केली आहे. या शंभर व्यापाऱ्यांची आर्थिक उलाढाल ५० कोटीपेक्षा जास्त आहे तर २०० पेक्षा अधिक व्यापाऱ्यांची उलाढाल २५ ते ३५ कोटीपेक्षा जास्त आहे. अशा सर्व छोट्या- मोठ्या व्यापाऱ्यांनी २०१३ पासून ते २०१६ पर्यंत तीन वर्षाचा एलबीटी कर भरलेला नाही. तर बऱ्याच व्यापाऱ्यांनी एलबीटी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात सुमारे चार हजारापेक्षा अधिक व्यापारी आहेत.