मांडवी येथे जप्त रेती मार्गावर, अपघात
By Admin | Updated: December 26, 2016 06:00 IST2016-12-26T06:00:30+5:302016-12-26T06:00:30+5:30
अंबाडी शिरसाड मार्गावरील मांडवी येथे महसूल विभागाने जप्त केलेली रेती व खडी या मार्गालगत टाकून दिली असून ती मार्गावर

मांडवी येथे जप्त रेती मार्गावर, अपघात
वसई/पारोळ : अंबाडी शिरसाड मार्गावरील मांडवी येथे महसूल विभागाने जप्त केलेली रेती व खडी या मार्गालगत टाकून दिली असून ती मार्गावर पसरल्याने या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी विरार पोलिस ठाणे अंतर्गत येणारी चौकी असूनही पोलीस या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. ते मोठी दुर्घटना घडण्याची वाट बघतात काय असा सवाल या भागात प्रवासी करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी या भागातील खानिवडे रेती बंदरात कारवाई करून रेतीच्या २५ ट्रकवर पोलीस व महसूल विभागासने कारवाई केली होती. कोर्टाने या ट्रक सोडण्याचा आदेश दिल्या नंतर त्या ट्रक मधील रेती मांडवी पोलीस चौकीजवळ मार्गावर ओतून दिल्याने ती या मार्गावर पसरून दुचाकी चालकांचे अपघात होत आहेत. या बाबत एमएमआरडीए च्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता याबाबत नोटीस पाठवून ती जबाबदारी महसूल विभागाची असल्याचे सांगितले. तर तहसिलदार गजेंद्र पाटोले यांनी या मार्गावर खाली केलेली रेती बाजुला करण्यात येईल असे सांगितले. पोलिसांनी रेती बाजूला करुन हा मार्ग प्रवासासाठी सुखकर करावा अशी मागणी या भागातील प्रवासी करत आहेत. (वार्ताहर)