ठाण्यातील अभिनय कट्टयावर सिंड्रेला चित्रपटाचे स्क्रीनिंग, सिनेमा पाहुन प्रेक्षक झाले भावुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 03:56 PM2018-12-03T15:56:16+5:302018-12-03T15:57:43+5:30

अभिनय कट्टा निर्मित "सिंड्रेला" चित्रपटाला ०३ वर्ष पूर्ण होत असून, या अभूतपूर्व यशानिमित्त कट्टयावर सिंड्रेला चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले होते.

Screening of Cinderella film in Thane's acting, watching the audience became emotional | ठाण्यातील अभिनय कट्टयावर सिंड्रेला चित्रपटाचे स्क्रीनिंग, सिनेमा पाहुन प्रेक्षक झाले भावुक

ठाण्यातील अभिनय कट्टयावर सिंड्रेला चित्रपटाचे स्क्रीनिंग, सिनेमा पाहुन प्रेक्षक झाले भावुक

Next
ठळक मुद्देअभिनय कट्टयावर सिंड्रेला चित्रपटाचे स्क्रीनिंगसिनेमा पाहुन प्रेक्षक झाले भावुकलहान मुलांनी चित्रपट बघण्यासाठी अभिनय कट्टयावर गर्दी केली होती

ठाणे :  विविध महोत्सवात व आंतरराष्ट्रीय नामांकने "सिंड्रेला" या चित्रपटाने मिळवली आहेत. यावेळी परिसरातील लहान मुलांनी चित्रपट बघण्यासाठी अभिनय कट्टयावर गर्दी केली होती. या चित्रपटाचे लेखन व दिगदर्शन किरण नाकती यांनी केले होते.

   गरीब असो की श्रीमंत स्वप्न सगळ्यांनाच पडतात,फरक एव्हढाच कि श्रीमंत ती स्वप्न विकत घ्यायचा विचार करतात आणि गरीब ती स्वप्न जगायचा प्रयत्न करतात. अशीच काही गोष्ट आहे चित्रपटातील राणी नावाच्या पात्राची. राणी आणि तिचा मोठा भाऊ झोपडपट्टीत राहत आपला उदरनिर्वाह करत असतात. अत्यंत हालाकीचं आयुष्य जगत असताना त्यांना दैनंदिन समस्यांना तोंड द्यावं लागते. परिस्तिथीने अनाथ केलेल्या या मुलांकडे पाहण्यासाठी कोणाकडेच वेळ नसून जो तो या शहरांच्या गर्दीत धावतो आहे.   राणी ला एक बाहुली आवडते,पण गरिबीमुळे तीला ती घेता येत नाही,तिचा मोठा भाऊ आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सतत प्रयत्न करत असतो.पण बाहुलीची पाच हजार इतकी मोठी किंमत मोजणे त्याला शक्य नसते. प्रसंगी ते दोघे पुस्तके देखील विकतात,पुढे राणी आणि तिचा भाऊ भंगार,प्लास्टिकच्या बाटल्या विकून आणि गणपतीच्या मुर्त्या घडवून पैसे कमावतात. आणि अखेर ती "सिंड्रेला" म्हणजेच बाहुली विकत घेतात. बाहुली पर्यंत पोहचण्यासाठी राणी ला अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते. भीक न मागता मेहनतीच्या जोरावर आपण पोट भरू शकतो याची जाणीव  तिला होते.पुढे राणी आणि तिचा भाऊ सिंड्रेला अनाथाश्रम बांधून अनाथ मुलांसाठी एक निवारा उभा करतात.  तसेच यावेळी अभिनय कट्ट्याच्या शुभम कदम,सहदेव साळकर,ओमकार मराठे,कुंदन भोसले, अमित महाजन,अभिषेक निगम,वैभव पवार  या कलाकारांनी सिंड्रेला चित्रपटातील टपोरी या गाण्यावर नृत्य केले. यावेळी निवेदन आदित्य नाकती याने केले व दीपप्रज्वलन जेष्ठ प्रेक्षक शांताराम जाधव यांनी केले.  चित्रपट खरंच अप्रतिम होता.अगदी सुरवातीपासून शेवटपर्यंत चित्रपटाने प्रेक्षकांना बांधून ठेवले होते.यातील राणी हे पात्र खरंच मनाला भावून गेले असे एका प्रेक्षकाने सांगितले.

Web Title: Screening of Cinderella film in Thane's acting, watching the audience became emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.