मोटारकारच्या धडकेत स्कूटर चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST2021-07-10T04:27:54+5:302021-07-10T04:27:54+5:30

ठाणे : मोटारकारच्या धडकेत स्कूटर चालक साहिल शेख (२७, रा. बाळकुम, कापूरबावडी, ठाणे) हा गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच ...

Scooter driver injured in car crash | मोटारकारच्या धडकेत स्कूटर चालक जखमी

मोटारकारच्या धडकेत स्कूटर चालक जखमी

ठाणे : मोटारकारच्या धडकेत स्कूटर चालक साहिल शेख (२७, रा. बाळकुम, कापूरबावडी, ठाणे) हा गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुरुवारी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तुळशीधामकडून तत्वज्ञान सिग्नलकडे एक मोटारकार ६ जुलै रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास भरघाव वेगाने जात होती. त्याचवेळी डीएव्ही स्कूलच्या पुढे तत्वज्ञान विज्ञापीठाच्या गेटच्या समोर घोडबंदर रोड येथे साहिल यांच्या स्कूटरला या मोटारकारने समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये साहिलच्या उजव्या कानाला तसेच डाव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्याच्या स्कूटरचे ही मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर या मोटारकार चालकाने साहिल याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, पोलिसांना कोणतीही माहिती न देता तो पसार झाला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात ८ जुलै रोजी मोटार वाहन कायदा कलम १८४ तसेच कलम २७९ नुसार चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Web Title: Scooter driver injured in car crash