कोलशेत येथे मोटारकारच्या धडकेत स्कूटरचालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST2021-07-22T04:25:01+5:302021-07-22T04:25:01+5:30

ठाणे : मोटारकारच्या धडकेत स्कूटरचालक आकाश जोशी (२८, रा. गोकुळनगर, ठाणे) हा डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाल्याची घटना ढोकाळी, ...

Scooter driver injured in car accident at Kolshet | कोलशेत येथे मोटारकारच्या धडकेत स्कूटरचालक जखमी

कोलशेत येथे मोटारकारच्या धडकेत स्कूटरचालक जखमी

ठाणे : मोटारकारच्या धडकेत स्कूटरचालक आकाश जोशी (२८, रा. गोकुळनगर, ठाणे) हा डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाल्याची घटना ढोकाळी, कोलशेत रोड येथे नुकतीच घडली. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती बुधवारी पोलिसांनी दिली.

आकाश हा त्याच्या स्कूटरवरून १७ जुलै रोजी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास कोलशेत रोडवरील हायलॅण्ड हॉस्पिटलजवळील रस्त्यावरून जात होता. त्याच वेळी त्याच्या मोटारसायकलच्या समोरून कापूरबावडी नाक्याकडून भरघाव वेगाने आलेल्या एका कारने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्याच्या डाव्या पायाला मार लागून पाय फ्रॅक्चर झाला. तसेच नाकालाही मार लागून तो जखमी झाला. या अपघातानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता हा कारचालक तिथून पसार झाला. याप्रकरणी आकाशने १८ जुलै रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार एस. एल. खोडे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Scooter driver injured in car accident at Kolshet