शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील शाळांनाही ऑनलाईनची परतावा रक्कम मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 13:05 IST

ठाणे जिल्ह्यातील शाळांना देय असलेली ११ वी ऑनलाईन प्रक्रियेतील शुल्काची रक्कम अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्या नंतर आता तातडीने देण्याची कार्यवाही ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने सुरू केली असून येत्या आठवडाभरात  जिल्ह्यातील सुमारे ४०० शाळांना  त्यांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा मेहनताना मिळणार आहे. 

 कल्याण - ठाणे जिल्ह्यातील शाळांना देय असलेली ११ वी ऑनलाईन प्रक्रियेतील शुल्काची रक्कम अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्या नंतर आता तातडीने देण्याची कार्यवाही ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने सुरू केली असून येत्या आठवडाभरात  जिल्ह्यातील सुमारे ४०० शाळांना  त्यांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा मेहनताना मिळणार आहे. 

अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबईतील उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालयांतर्गत सर्व शाळांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा लाखो रुपयांचा मेहनताना मिळाला. परंतु ठाणे जिल्ह्यातील शाळांना परताव्याची रक्कम मिळत नव्हती. याबाबत अनेक शाळांनी अनिल बोरनारे यांच्याकडे तक्रार केली. बोरनारे यांनी लागलीच मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक व ठाणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांना तातडीने शाळांना रक्कम न मिळाल्यास पुढील वर्षी ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घातला जाईल असा इशारा दिला. त्यानंतर प्रशासनाने हालचाल करून १६ तारखेपर्यंत शाळांकडून माहिती बोलावली असून त्यानंतर लगेच शाळांना त्यांचा परतावा दिला जाणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.  मुंबई विभागात दरवर्षी ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येते त्यासाठी विद्यार्थ्यांकडून नोंदणीसाठी शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क आकारण्याची जबाबदारी शाळांकडे असते. शाळा एकत्रित रक्कम ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने काढलेल्या बँकेच्या खात्यात जमा करते. शाळा प्रत्येक विद्यार्थ्यांचे रेजिष्ट्रेशन व ऑप्शन फॉर्म भरून घेतात यासाठी शाळेला स्वतःचा स्टाफ वापरावा लागतो एका विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून घेण्यासाठी साधारणपणे १५ मिनिटे लागतात विद्यार्थी संख्या पाहता यात शाळांचा खूप वेळ जातो. यासाठी शाळेला नेट चार्ज, प्रिंटर्स, मदतनीस टेक्निशियन व स्टेशनरी साठी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे काही हिस्सा दिला जातो.   परंतु वर्ष उलटले तरी रक्कम शाळांना वितरित केली नाहीदरवर्षी मुंबई महानगरक्षेत्रात १० वी उत्तीर्ण होऊन हजारो विद्यार्थी ११ वी साठी ऑनलाईन प्रवेश घेतात त्यांची एकत्रित रक्कम लाखो रुपये होते त्यातील शाळांचा  मेहनताना म्हणून प्रती विद्यार्थी रक्कम प्रवेश प्रक्रिया संपल्यावर मिळणे अपेक्षित असतांनाही वर्ष उलटून गेल्यावर शाळांना रक्कम वितरित झालेली नव्हती. याबाबत कल्याण-डोंबिवली तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनीही पाठपुरावा केला होता.  आता तातडीने कार्यवाही सुरू केल्याने ऑनलाईन प्रक्रियेवरील बहिष्कार मागे घेत असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

सुट्टी असूनही कार्यालय सुरू

शाळांना त्यांचा ऑनलाईन कामाचा मेहनताना तातडीने मिळावा यासाठी काल शनिवार व आज रविवारची सुट्टी असूनही शाळांकडून माहिती गोळा करण्याचे काम अधिकाऱ्यांनी सुरू ठेवले असून अनिल बोरनारे यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रthaneठाणे