शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका महासभेत गाजला शाळा अतिक्रमणाचा प्रश्न, प्रांत कार्यालयाला विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 18:26 IST

या प्रकाराने मालमत्ता विभागातील सावळा गोंधळ उघड होऊन, शाळा खोल्यांच्या मालकी बाबत सहायक आयुक्त भगवान कुमावत यांना प्रांत कार्यालयाला पत्र पाठवून विचारणा करावी लागली आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर - भूमाफियानी अतिक्रमण केलेल्या महापालिका शाळा खोल्यांची नोंद महापालिका मालमत्ता विभागाच्या दफ्तरी नसल्याचे महासभेत उघड झाले. या प्रकाराने मालमत्ता विभागातील सावळा गोंधळ उघड होऊन, शाळा खोल्यांच्या मालकी बाबत सहायक आयुक्त भगवान कुमावत यांना प्रांत कार्यालयाला पत्र पाठवून विचारणा करावी लागली आहे.उल्हासनगर महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत राणी लक्ष्मीबाई शालेच्या खोल्यावर झालेल्या अतिक्रमण बाबत भाजपसह शिवसेना नगरसेवक आक्रमक झाले होते. शाळा खोल्यावार अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियावर गुन्हा दाखल करून खोल्या मधून साहित्याची चोरी केली. याचाही तपास करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी, मनोज लासी आदींनी केली. सभागृह नेते व शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शाळा अतिक्रमण प्रकरणी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे भाजपसह बहुतांश नगरसेवकांनी कौतुक केले. मात्र ज्या शाळा खोल्यावर अतिक्रमण झाले. त्याची नोंद महापालिका मालमत्ता विभागाच्या दफ्तरी नसल्याचे उघड झाले. सहायक आयुक्त भगवान कुमावत यांनी प्रांत कार्यालयाला पत्र पाठवून खोल्यांची मालकी कोणाची. याची माहिती मागितली आहे. मालमत्ता विभागातील या गोंधळाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच वाणिज्य पाणी बिल बाबत अभय योजना लागू करणे, चालीया उत्सव दरम्यान मुख दर्शन साठी मान्यता देणे. आदी विषय महासभेत मंजूर झाले.महासभेचे पिठासिन अधिकारी व उपमहापौर भगवान भालेराव यांनी महापालिकेच्या काही भूखंडावर सनद काढली जात आहे. याप्रकारची व शाळा खोल्यांच्या मालकीची तपास करण्यात येणार असून तसे आदेश आयुक्तांना दिल्याची माहिती भालेराव यांनी दिली. अतिक्रमण झालेल्या शाळेच्या खोलीत वर्षानुवर्षे शिकविले जात होते. तसेच खोली मोडकळीस आल्याने खोल्यात डेक्स बेंच ठेवण्यात आले होते. वर्ग खोलीत शिकविण्या साठीचा फळा व शैक्षणिक साहित्य खोल्यात असल्यावर अचानक खोल्या दुसऱ्याच्या कश्या झाल्या?. असा प्रश्न सभागृह नेते राजेंद्र चौधरी यांनी केला असून सखोल चौकशी झाल्यास मोठी खळबळ उडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. एकूणच भूमाफिया शहरात वरचाड ठरला असून महापालिका प्रशासन, सत्ताधारी व विरोधक यांची विरोधाची धार कमी झाल्याची टीका होत आहे. १५४ भूखंड पैकी फक्त ८ भूखंडाला सनदउल्हासनगर विस्थापिताचे शहर असून शहरातील जागेची मालकी सुरवातीला केंद्र शासनाची होती. कालांतराने केंद्राने जागेची मालकी शहरा ऐवजी राज्य शासनाकडे हस्तांतरित केली. राज्याने जागेची मालकी महापालिकेकडे हस्तांतरित करायला हवी होती. मात्र तसे न झाल्याने सनदचे भूत शहरावर बसले असून सनदीच्या नावाखाली अनेक भूखंड भूमाफियानी घश्याखाली घातले आहे. असे प्रकार वारंवार घडत असून पालिकेच्या ताब्यातील १५४ पैकी फक्त ८ भूखंडाचे हस्तांतरण पालिकेकडे झाल्याची माहिती उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरSchoolशाळा