ठाण्यातील स्कूल बसला वाहतूक आचारसंहिता

By Admin | Updated: October 26, 2016 05:21 IST2016-10-26T05:21:53+5:302016-10-26T05:21:53+5:30

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागास तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात शाळा भरण्याची व सुटण्याच्या वेळी तर शाळेच्या बस वाहतूक

The School Bus Traffic Code of Thane | ठाण्यातील स्कूल बसला वाहतूक आचारसंहिता

ठाण्यातील स्कूल बसला वाहतूक आचारसंहिता

ठाणे : शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागास तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात शाळा भरण्याची व सुटण्याच्या वेळी तर शाळेच्या बस वाहतूक विस्कळीत करीत आहेत. यामुळे वाहतूककोंडीला सामारे लावे लागते. यास आळा घालण्यासाठी व या स्कूल बसेसला शिस्त लावण्याकरीता सहा महिन्याच्या कालावधी करीता शहरात या वाहनांच्या पार्किंग करीता वाहतूक विभागाने अधिसूचना जारी केली आहे.
ठाणे शहरामध्ये अनेक शाळा व शैक्षणिक संस्था असून त्यात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतांश शाळा सकाळ व दुपार च अशा दोन सत्रांमध्ये भरतात. त्या भरण्याची व सुटण्याची वेळ जवळजवळ एकच असल्याने त्यांच्या परिसरात एकाचवेळी वाहतूककोंडी होते. बहुतांश शाळांमध्ये त्यांच्या स्कूल बसेस, व्हॅन पार्किगाकरीता स्वत:ची जागा नसल्याने ही वाहने रस्त्यावरच थांबवून विद्यार्थ्यांची चढउतार करतात. यामुळे रहदारीच्या रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. यातून शालेय मुलांच्या सुरक्षेसदेखील अडचण निर्माण होत आहे.
यामुळे संबंधीत रस्त्यांवरून नागरिकांना चालणेदेखील कठीण होत आहे. शाळेच्या बाहेरील परिसरात वाहतूककोंडीच्या वेळी बेदरकार वाहन चालकांमुळे पाल्य तसेच विद्यार्थ्यांनादेखील धोका संभवत आहे. त्यांची सुरक्षा विचारात घेऊन शाळेच्या बाहेरील परिसरातील वाहतूक सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
ज्या शाळांची स्वत:ची वाहन पार्किंगची व्यवस्था आहे, त्यांनी त्यांच्या स्कूल बसेस व व्हॅन रस्त्यावर उभ्या न करता शाळेच्या आवारात उभ्या करु न विद्यार्थ्यांची चढउतार करावी. तसेच पाल्यांची शाळेत ने-आण करणाऱ्या पालकांची खाजगी वाहने देखील शाळेच्या आवारात उभी करावेत.
स्वत:ची पार्किग व्यवस्था नसलेल्या शाळांनी त्यांच्या बसेससाठी कोणत्याही परिस्थितीत रस्त्याच्या एकापेक्षा जास्त मार्गीका अडल्या जाणार नसल्याची दक्षता घेण्याचे सुनिश्चित करणे अपेक्षित आहे. याशिवाय शाळेच्या परिसरातील वाहतूक सुनिश्चित ठेवण्यासाठी शाळेने प्रती मीटर अंतरासाठी एका ट्रॉफिक वॉर्डनची नियुक्ती करावी असे देखील अधिसूचनेत नमूद केले आहे. ही अधिसूचना पुढील सहा महिन्याकरीता अंमलात राहणार आहे. यावर हरकतीही मागवण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The School Bus Traffic Code of Thane