शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

RTE द्वारे ठाणे जिल्ह्यातील अवघ्या २१४५ विद्यार्थ्यांचे शालेय प्रवेश

By सुरेश लोखंडे | Updated: April 27, 2023 16:38 IST

उर्वरित विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ८ मे पर्यंतची संधी

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जिल्ह्यातील वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ १ ली ते ८ वी पर्यंतचे शालेय शिक्षण विनाशुल्क दिले जात आहे. त्यासाठी शिक्षणाचा हक्क या कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी निवड झालेल्या दहा हजार ९९६ विद्यार्थ्या र्पैकी अवघ्या दाेन हजार १४५ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश मुदती अखेर निश्चित केले. उर्वरीत बालकांच्या प्रवेशासाठी ८ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी २५ एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुभा हाेती.

जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शालेय प्रवेश प्रक्रीया २०२३-२४ हाती घेण्यात आलेली आहे. यासाठी ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपा कार्यक्षेत्रात आर.टी.ई.च्या २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी लॉटरी पध्दतीने झालेल्या निवड यादीमध्ये ठाणे जिल्हयातील एकूण १० हजार ९९६ विद्यार्थ्या र्ची निवड झाली आहे. त्यापैकी मुदती अखेर अवघ्या दाेन हजार १४५ बालकांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत . निवड झालेल्या उर्वरीत बालकांच्या प्रवेशासाठी ८ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी ऍडमिट कार्ड तसेच हमी पत्राची ची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका, महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पालकांनी पडताळणी समितीकडून दिलेल्या मुदतीत पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करून प्रवेश निश्चित करावा. प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर एसएमएसवर प्राप्त होतील परंतु या एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅब वर अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही याची पालकांनी खात्री करून घ्यावी. या निवड यादीतील विद्यार्थ्यानी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील. या प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी संबंधित तालुका, मनपा कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे जि.प.चे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा