शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 23:42 IST

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्ह एकदा 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत, आता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्ह एकदा 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत, आता उद्धव ठाकरे यांना निशाण्यावर घेतले आहे. यावेळी राज यांनी थेट शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ दाखवत, 'तुम्ही म्हणताना माझे वडील चोरले, माझे वडील चोरले, त्या वडीलांबद्दल एवढं प्रेम आहे. मग, बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता? तुम्ही तुमच्या पक्षाचा नेता करता? आणि तुमच्या वडलांवर प्रेम आहे म्हणून सांगता?" अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी ठाण्यातील सभेतून जहरी टीका केली. ते श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, "आज कोण-कुणावर बोलतोय आणि कोण कुणावर आरोप करतंय, सगळं सोडून द्या. अरे, तुम्ही म्हणताना माझे वडील चोरले, माझे वडील चोरले, त्या वडीलांबद्दल एवढं प्रेम आहे, मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे, एकच... मी खरे तर एकदाच बोललो होतो मागच्या सभांमध्ये, लावा रे तो व्हिडीओ, तेव्हा पासून सगळ्यांनी तेचं सुरु केलं. पण आता सांगतोय, लावा रे तो व्हिडीओ...," असे म्हणत राज यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा एक व्हिडीओ दाखवत, उद्धव ठाकरेंवर टीका केली.

"यांच्या (सुषमा अंधारे) अनेक क्लिप्स आहेत. पण मला त्यांच्या क्लिप्सशी काही देणं-घेणं नाही. मात्र, ज्या बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई... '70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यानंतर लटलटणारा हा हात', असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता? तुम्ही तुमच्या पक्षाचा नेता करता आणि तुमच्या वडलांवर प्रेम आहे म्हणून सांगता?" असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. 

...त्या छगन भुजबळांसोबत, तुम्ही मांडीला मांडी लावून बसता? - ज्या छगण भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या छगन भुजबळांसोबत, तुम्ही भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर एका मंत्रीमांडळात मांडीला मांडी लावून बसता, तेव्हा वाटत नाही? की माझ्या वडिलांना अटक करायला लावणारा हा मानूस याच्यासोबत मी बसणार नाही. वाटलं नाही तेव्हा? कसलं फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही?  असेही राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSushma Andhareसुषमा अंधारेRaj Thackerayराज ठाकरे