शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

संवाद म्हणणे म्हणजे अभिनय नाही- गोखले

By admin | Updated: April 21, 2016 02:01 IST

नुसते संवाद वाचणे म्हणजे अभिनय नव्हे. उत्तम अभिनेता होण्यासाठी चांगला खेळाडू असणे गरजेचे आहे. सर्व शारिरिक अवयवांचा वापर करता आला तरच तो उत्कृष्ट अभिनेता होऊ शकतो

विरार: नुसते संवाद वाचणे म्हणजे अभिनय नव्हे. उत्तम अभिनेता होण्यासाठी चांगला खेळाडू असणे गरजेचे आहे. सर्व शारिरिक अवयवांचा वापर करता आला तरच तो उत्कृष्ट अभिनेता होऊ शकतो. सध्याच्या स्पर्धेच्या युगात त्याचा निभाव लागू शकतो, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी विरार येथे बोलताना व्यक्त केले. अमेय स्पोर्टसने विरार येथील यशवंत नगर येथे जिल्हास्तरीय कबड्डी आणि राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी उपस्थित असलेल्या विक्रम गोखले यांनी आपले विचार मांडताना, उत्तम खेळाडू चांगला अभिनेता बनू शकतो. खेळाचा आणि चित्रपटाचा अतिशय जवळचा संबंध आहे. कराटे, हॉकी, बॉक्सींग यासह विविध खेळांशी संबंधित चित्रपट तयार झाले आणि प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, असेही गोखले यांनी यावेळी सांगितले. आपण स्वत: कराटे चॅम्पियन असून अनेक ठिकाणी खेळ आणि अभिनयाचे धडे देतो, असेही गोखले यांनी सांगितले. जिल्ह्यातील कबड्डीपटूंना प्रो कबड्डी लीगचे दालन उघडावे, महाराष्ट्रात त्यांची दखल घेतली जावी यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील उत्तम खेळाडू निवडून त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाईल, असे अ‍ॅकॅडमीच्या संचालिका ग्रीष्मा पाटील यांनी सांगितले. प्रथम महापौर राजीव पाटील, बविआचे संघटक सचिव अजीव पाटील, नगरसेवक हार्दिक पाटील, अ‍ॅकॅडमीच्या साधना पाटील, संतोष पिंगुळकर, दयानंद पाटील, अ‍ॅड. सुहास पाटील यावेळी उपस्थित होते. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त विरारमध्ये प्रथमच महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ लगोरीच्या प्रसारासाठी राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (वार्ताहर)