शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले कलामंदिर : ‘रखडनाट्य’ संपता संपेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 03:48 IST

वातानुकूलित यंत्रणा बदलण्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

डोंबिवली : वातानुकूलित यंत्रणा बदलण्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर बंद ठेवण्यात आले आहे. साडेतीन महिने उलटूनही हे काम अद्याप सुरू झालेले नाही. या रखडनाट्याला प्रशासनाबरोबरच राजकीय अनास्थाही कारणीभूत असल्याची चर्चा आहे. कामाला होत असलेल्या विलंबाबाबत कलाकारांमध्ये नाराजी असून ही सांस्कृतिक उपासमार कधी थांबणार, असा सवालही रसिक करत आहेत.एप्रिल २०१७ मध्ये कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर देखभाल-दुरुस्तीसाठी बंद केले होते. मात्र, वर्ष उलटूनही काम सुरू झाले नव्हते. अखेर, दीड वर्षाने काम पूर्ण होऊ न या नाट्यगृहाचा पडदा १ आॅक्टोबर २०१८ ला उघडला होता. हीच अनास्था डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिराबाबत दिसत असून नियोजनाचा अभावच याला कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. सावित्रीबाई फुले कलामंदिर हे नाट्यगृह एमआयडीसी भागात आहे. याठिकाणी रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणाचा फटका नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणेला बसत असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर कल्याणच्या अत्रे रंगमंदिराच्या धर्तीवर येथे चिलर वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात येणार आहे. गणेशोत्सवात नाट्यप्रयोग बंद असतात. त्यामुळे या कामासाठी फुले कलामंदिर ८ सप्टेंबरपासून बंद ठेवण्यात आले आहे. पण, आता नाताळ आला तरी या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. नाट्यगृह बंद करताना तीन महिन्यांत वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला होता. साडेतीन महिने उलटूनही प्रत्यक्षात काम सुरू झालेले नसल्याने प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. त्याचबरोबर कलाकार आणि रसिकांचाही अपेक्षाभंग झाला आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रियाही पार पडून या कामाला स्थायी समितीची मान्यताही मिळाली आहे. मग घोडे अडले कुठे, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला साजरा करण्यात आला. त्यावेळी कलाकारांनी नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती उपस्थित असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांकडे केली होती. लवकरच कंत्राटदाराला कार्यादेश दिले जातील आणि कामाला प्रारंभ केला जाईल, असे त्यावेळी सांगण्यात आले, पण अद्यापपर्यंत ठोस कार्यवाही न झाल्याने डोंबिवलीकरांची सांस्कृतिक उपासमार कायम राहिली आहे. महापौर विनीता राणे आणि ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी दुरुस्तीसाठी बंद असलेले आचार्य अत्रे रंगमंदिर लवकर सुरू व्हावे, म्हणून विशेष पुढाकार घेतला होता. पण, डोंबिवलीतील नाट्यगृहाच्या कामाबाबतही त्यांनी पुढाकार घ्यावा आणि नाट्यगृह चालू करावे, अशी मागणी नाट्यरसिक करत आहेत.काम लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न : कामाला विलंब होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण, कामांचा दर्जा उत्तम राखणे, तसेच नियमानुसार काम होणेही अपेक्षित असते. अत्रे रंगमंदिराप्रमाणे सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे कामही लवकरच पूर्ण करण्यावर आमचा विशेष भर असल्याचे महापौर विनीता राणे यांनी सांगितले.उद्देशालाच फासला हरताळडोंबिवली शहराची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख आहे. मात्र, या नगरीतच सांस्कृतिक उपासमार सुरू आहे. देखभाल दुरुस्ती महत्त्वाची आहे, पण अशा प्रकारे काम सुरू व्हायला विलंब लागत असल्यास ते बरोबर नाही. नाट्यगृहे अशा प्रकारे दुरुस्तीच्या नावाखाली कोणतेही काम सुरू न करता महिनोन्महिने बंद ठेवून मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. याला सर्वस्वी प्रशासनाबरोबर सत्ताधाºयांचीही उदासीनता कारणीभूत असल्याचे केडीएमसीचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी सांगितले.दोन दिवसांत कामाला प्रारंभ : काम सुरू करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामाला प्रारंभ केला जाणार आहे. दोन ते तीन दिवसांत कामाला सुरुवात होईल, असा दावा केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण