शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

रद्दीत जाणाऱ्या पुस्तकांचे जतन; दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 00:15 IST

कॉस्मिक इकॉलॉजिकल ट्रस्ट, मैत्री फाउंडेशनचा उपक्रम

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : दुर्मिळ ग्रंथसंपदा हे ज्ञानाचे भंडार आता अडगळीत पडू लागले आहे. त्यांचे महत्त्व माहीत नसल्याने ते घरात अडगळ ठरू लागते आणि हा अमूल्य ठेवा रद्दीची भर ठरतो. हा ठेवा जतन करण्यासाठी कॉस्मिक इकॉलॉजिकल ट्रस्ट आणि मैत्री फाउंडेशन यांनी पुढाकार घेऊ न या पुस्तकांचे डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पुस्तके संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार आहे.पूर्वीच्या काळात ग्रंथ हे ज्ञानाच्या आदानप्रदानाचे साधन होते. एका पिढीकडून दुसºया पिढीकडे ज्ञान संक्रमित व्हावे, यासाठी पुस्तकांचे लिखाण केले जात होते. त्यामुळे हे ज्ञान जतन करण्यासाठी नागरिकांना रद्दीतील व घरातील पुस्तके देण्याचे आवाहन केले आहे. ही सर्व पुस्तके संस्था स्वखर्चाने डोंबिवलीत आणणार आहेत. नागरिकांनी केवळ पुस्तके असल्याची माहिती संस्थेला द्यायची आहे. या पुस्तकांतून दुर्मिळ ग्रंथ वेगळे करून इतर पुस्तके आदिवासीपाडे, अनाथाश्रम, गावखेड्यांतील वाचनालयांना भेट देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या चळवळीला हातभार लावावा, असे आवाहन ‘कॉस्मिक इकॉलॉजिकल’चे डॉ. उदयकुमार पाध्ये यांनी केले आहे.आतापर्यंत एक हजारांच्या आसपास पुस्तके जमा झाली आहेत. यामध्ये दादर, भार्इंदर, मुंबई, अंधेरी, विक्रोळी अशा विविध भागांतून प्रतिसाद मिळत आहे. ही सर्व पुस्तके प्रवीण गावडे यांच्या फडके रोडवरील घरात ठेवण्यात येणार आहेत. गावडे हे रेल्वेत नोकरी करत असून या सामाजिक कार्याला त्यांनी आपली जागा मोफत दिली आहे. शासनसुद्धा ग्रंथालयांच्या मदतीने दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन करत आहे. त्यांनी त्यांचे काम करावे. आम्ही आम्हाला जी पुस्तके उपलब्ध होतील, त्यांचे डिजिटलायझेशन करणार असल्याचे ‘मैत्री’च्या अध्यक्षा सृष्टी गुजराथी यांनी सांगितले. तसेच फोर्ट येथे जाऊन जुनी पुस्तके विकत घेण्याचीही संस्थेची तयारी आहे, अशी माहिती सुधीर इनामदार यांनी दिली. या कामात डॉ. अशोक जैन, डॉ. एस. के. वर्मा यांचे सहकार्य मिळाले आहे.अनेक ग्रंथ झाले जमासंस्थेला १८४४ चे ‘त्रैलोक्य प्रकाश’ हे पुस्तक उपलब्ध झाले आहे. लाहोरच्या एका कुशल अ‍ॅस्ट्रोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने एका ऋषीमुनींच्या हस्तलिखितांवरून हे पुस्तक छापले आहे. या पुस्तकांचे लेखक हेमप्रभा सुरी आहेत. डॉ. बनारसी जैन यांनी त्याला प्रस्तावना दिली आहे.‘चातकशिरोमणी’ हे पुस्तक १९३६ मध्ये दुसरी आवृत्ती आहे. हे पुस्तक आता बाजारात आहे; पण त्यात दोन दुर्मिळ अशा ग्रंथाची माहिती दिली आहे. त्यामध्ये ‘मयूरचित्रक’ हे रायगड येथे हस्तलिखित सापडले, त्यांचा उल्लेख या पुस्तकांत आहे. मयूरचित्रकावरून कोणत्या नक्षत्रांवर पाऊस पडेल. कोणत्या पिकांना फायदा होईल हे दिले आहे. ‘शतमंजिरी राजयोग’ हाही दुर्मिळ भाग यात आढळून येत आहे.‘कलम करण्याचे शास्त्र’ या पुस्तकात ब्रिटिशकालीन बागकामांची माहिती दिली आहे. ना.म. पटवर्धन यांचे ‘प्रमुख पिके आणि ते पिकविणारे लोक’ हे पुस्तकही उपलब्ध झाले आहे. १९४१ मध्ये या पुस्तकांची दुसरी आवृत्ती निघालीआहे. या पुस्तकात स्वीडन, स्पेन, सौदी अरेबिया, ब्रह्मदेश, डेन्मार्क, कॅनडा येथील पिकांची माहिती आणि पिकवणाऱ्यांची माहिती दिली आहे.‘वर्ल्ड मॅप’ या पुस्तकात जगाचा नकाशा तसेच सूर्याची उंची मोजण्याची साधने, होकायंत्र यांची माहिती दिली आहे. औषधी पुस्तके ही काही उपलब्ध झाली आहेत. त्या पुस्तकात मोडी लिपीचा उल्लेख आढळून येत आहे. मा. का. देशपांडे यांचा इंग्रजी सुवचनांचा कोष, नर्सिंगवरील पुस्तक, १९४० मधील संगीत शास्त्रावरील पुस्तक, जलचिकित्सा यावरील पुस्तके उपलब्ध आहेत.