शिरवलीत खेळला जातो गणेशोत्सवात सारीपाट

By Admin | Updated: September 12, 2016 03:04 IST2016-09-12T03:04:36+5:302016-09-12T03:04:36+5:30

महाभारतात खेळला गेलेला सारीपाट (द्यूत) खेळ ज्या खेळाचे दर्शन जय मल्हार मालिकेतून महाराष्ट्राला झाले. तो सारीपाट खेळ गणेशोत्सवाच्या दिवसात वसईतील शिरवली या गावात खेळला जातो आहे.

Sarvat is played in Ganesh Festival | शिरवलीत खेळला जातो गणेशोत्सवात सारीपाट

शिरवलीत खेळला जातो गणेशोत्सवात सारीपाट

सुनील घरत, वसई/पारोळ
महाभारतात खेळला गेलेला सारीपाट (द्यूत) खेळ ज्या खेळाचे दर्शन जय मल्हार मालिकेतून महाराष्ट्राला झाले. तो सारीपाट खेळ गणेशोत्सवाच्या दिवसात वसईतील शिरवली या गावात खेळला जातो आहे. ही परंपरा ८० वर्षांपासून सुरू आहे. हा खेळ पालघर जिल्हात शिरवली याच गावात फक्त गणेशोत्सव काळातच खेळला जातो.
हा खेळ कापडी सारीपाटा वर खेलला जातो लाकडी सोंगट्या त्या पटावर ठेऊन हा खेळ सुरु होतो. या खेळात फासे म्हणून कवड्यांचा वापर केला जातो. ज्या प्रमाणे खेळाडू कवड्याचे दान घेतो त्या दानानुुसार सोंगटी पटावर चालवली जाते. हा खेळ दोन गटात खेळला जात असल्यामुळे ज्या गटाच्या सोगंट्या सारीपाटÞाच्या मघ्यभागी जातील तो विजयी होतो. तर एका गटाने सोंगटी मारली असताना दुसऱ्या विरोधी गटाने त्या गटाची सोंगटी मारली तर हा खेळ बरोबरीत सुटतो तर काही वेळा दान जास्त पडल्यामुळे भूत उठते त्या वेळी या खेळाला मोठी गंमत येते.
याचा डाव पूर्ण होण्यासाठी ४ तास लागतात विशेष म्हणजे या खेळात पैशाचा वापर केला जात नाही. ८० वर्षांपासून गणपतीत करमणुकीसाठी हा खेळ खेळला जातो. पूर्वी या खेळात मोठया प्रमाणात तरुण वर्गाचा सहभाग असायचा पण या काळात पत्ते खेळण्याचे प्रमाण वाढल्याने तरुण वर्गाने या खेळा कडे पाठ फिरवली आहे.

Web Title: Sarvat is played in Ganesh Festival