सरपंचाने केली ग्रामसेवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:23+5:302021-04-04T04:41:23+5:30
मुरबाड : तालुक्यातील साजई ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजेश देशमुख यांनी अनियमितता केल्याचा आरोप करत सरपंच दीपक देसले यांनी ग्रामसेवकांना पंचायत ...

सरपंचाने केली ग्रामसेवकाला मारहाण
मुरबाड : तालुक्यातील साजई ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजेश देशमुख यांनी अनियमितता केल्याचा आरोप करत सरपंच दीपक देसले यांनी ग्रामसेवकांना पंचायत समिती कार्यालयातच मारहाण केली. या घटनेने पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या मारहाणीचा निषेध केला आहे.
ग्रामसेवक देशमुख यांनी ग्रामपंचायतीत सरपंच यांना विश्वासात न घेता वेगवेगळ्या खात्यातील लाखो रुपये काढून ते गायब असल्याचे सरपंच देसले यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ग्रामसेवक देशमुख यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र प्रशासन या ग्रामसेवकाला पाठीशी घालत असल्याने आपणच या ग्रामसेवकाला धडा शिकवू असा निर्धार देसले यांनी केला.
ग्रामसेवक गुरुवारी पंचायत समितीच्या कार्यालयात दिसताच त्यांनी त्याला जाब विचारण्याआधीच बेदम मारहाण केली. त्यावेळी संतप्त सरपंचांच्या तावडीतून कशीबशी सुटका करत बचावासाठी ग्रामसेवकाने गटविकास अधिकाऱ्याचे दालन गाठले, परंतु तेथेही सरपंचाने प्रवेश करत यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, याला मी सोडणार नाही अशी धमकी दिली. याबाबत गटविकास अधिकारी रमेश अवचार यांनी दोघांनीही कागदावर तुमचे म्हणणे लिहून द्या, आम्ही योग्य ती चौकशी करून कारवाई करू असे सांगितले. सभापती दीपक पवार व गटविकास अधिकारी रमेश अवचार हे उपस्थित असताना ग्रामसेवकाला केली जाते याचा निषेध व्यक्त केला जात आहे.
----------------------------------------------
ग्रामसेवक राजेश देशमुख हे माझ्या दालनात रडत आले असता त्यांना झालेल्या प्रकाराबद्दल लेखीपत्र देण्यासाठी मी सांगितले. मात्र त्यांनी दिलेले पत्र मला मिळाले नाही.
- रमेश अवचार, गटविकास अधिकारी
ग्रामसेवक राजेश देशमुख माझ्यावर आरोप करीत आहे. त्यांनी केलेला प्रकार हा प्रसार माध्यमांसमोर आणण्यासाठी मी कोणतेही पाऊल उचलू शकतो.
- दीपक देसले, सरपंच