महिलांची पर्स चोरणाऱ्या सराईत चोराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST2021-08-15T04:40:55+5:302021-08-15T04:40:55+5:30

डोंबिवली : डोंबिवली रेल्वेस्थानकाच्या बाहेर असलेल्या बाजारपेठेत एका महिलेची पर्स चोरून एक चोर पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. ...

Sarait thief arrested for stealing women's purses | महिलांची पर्स चोरणाऱ्या सराईत चोराला अटक

महिलांची पर्स चोरणाऱ्या सराईत चोराला अटक

डोंबिवली : डोंबिवली रेल्वेस्थानकाच्या बाहेर असलेल्या बाजारपेठेत एका महिलेची पर्स चोरून एक चोर पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, डोंबिवली रेल्वे पोलिसांनी फलाटावरून पळून जाणाऱ्या चोराला पाठलाग करत पकडले. यापूर्वीदेखील या चोरट्यावर अन्य लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहन सोळंखी (२५) असे असून तो कल्याण पूर्व येथील मलंगगड रोडवरील गणेश चाळ, नमस्कार ढाबा येथे राहतो, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. ११ ऑगस्टला सायंकाळी ७.३० वाजता डोंबिवली रेल्वे फलाट क्रमांक ५च्या बाजूकडील मार्केटमध्ये फिर्यादी नलिनी मैड या खरेदीसाठी आल्या होत्या. मोहन हा गर्दीचा फायदा घेत नलिनी यांचे पाकीट खेचून फलाट क्रमांक ५ वर पळत होता. यावेळी तेथे फलाटावर तैनात असलेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल जाधव व भोईनवाड यांनी फलाटावरून पळत असताना चोरट्याला पाहिले. दोन्ही पोलिसांनी त्याला पाठलाग करून अटक केली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिक कौतुक करत आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

-------------

Web Title: Sarait thief arrested for stealing women's purses