शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

पावसाची शेतीकामाला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 3:31 AM

दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रविवारी पावसाने जराशी विश्रांती घेताच, ग्रामीण भागात भातलावणीला ठिकठिकाणी सुरुवात झाली.

ठाणे : दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रविवारी पावसाने जराशी विश्रांती घेताच, ग्रामीण भागात भातलावणीला ठिकठिकाणी सुरुवात झाली. शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे मात्र अद्याप तहानलेलीच आहेत.रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी कमीअधिक पाऊस पडला. मागील २४ तासांच्या कालावधीत सरासरी १७९.३४ मिमी मुसळधार पावसाची नोंद झाली.ठाणे शहरात एका जुन्या इमारतीच्या दोन मजल्यांसह एक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली असून सुदैवाने त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. शहरातील वंदना टॉकीजसमोर व अन्य ठिकाणी झाडे उन्मळून पडली.जिल्ह्यात मुसळधार पडलेल्या या पावसाची सरासरी १७९.३४ मिमी नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली. सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात ३८० मिमी, तर याखालोखाल कल्याण तालुक्यात २४५ मिमी, अंबरनाथला १९२, उल्हासनगरला १८६, ठाण्याला १२५, मुरबाडला ६७ आणि शहापूर तालुक्यात केवळ ६० मिमी पाऊस पडला आहे. मागील वर्षी १०१७.७० मिमी पाऊस पडला होता. त्या तुलनेत यंदा आतापर्यंत ११८२.२० मिमी म्हणजे सरासरी १६४.४६ मिमी जादा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये आतापर्यंत ४८.२५ टक्के पाऊस पडला आहे.शहरांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात ११२ मिमी पाऊस पडला असून आतापर्यंत या धरणात ११८.५८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला. यामध्ये सध्या ५० टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी तो ५८ टक्के होता. भातसामध्ये केवळ ४४ मिमी, मोडकसागरमध्ये ११८, आंध्रात केवळ ५१ मिमी पाऊस सकाळी ८ वाजेपर्यंत पडला.बारवी धरणात ५.५७ टक्के पाणीसाठा तयार झाला. आतापर्यंत या धरणात ७७५ मिमी पाऊस पडला. याप्रमाणेच भातसा धरणात दोन दिवसांच्या कालावधीत तीन टक्के पाणीसाठा वाढून तो ४५ टक्के झाला. मागील वर्षी या दिवसापर्यंत भातसामध्ये ५३ टक्के पाणीसाठा होता. मोडकसागरमध्ये ७९ टक्के पाणीसाठा तयार झाला. मागील वर्षी तो केवळ ६५ टक्के होता.जुन्या इमारतीचे दोन मजले कोसळलेठाणे शहरातील शाहू मार्केटजवळील जुन्या इमारतीचे दोन मजले पडले. ही धोकादायक इमारत असल्यामुळे त्यात कोणीही रहिवासी नव्हते. त्यामुळे सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायंकाळच्या सुमारात ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री ही इमारत पाडण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात ३८० मिमी, तर याखालोखाल कल्याण तालुक्यात २४५ मिमी, अंबरनाथला १९२, उल्हासनगरला १८६, ठाण्याला १२५, मुरबाडला ६७ आणि शहापूर तालुक्यात केवळ ६० मिमी पाऊस पडला आहे.दरड कोसळण्याच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून भिवंडी तालुक्यातील नारपोली येथील अजमेरनगर टेकडीवरील २६ कुटुंबांतील १५६ नागरिकांना रविवारी नारपोली येथील पालिकेच्या शाळेत स्थलांतरित केले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे