शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत जामिनावर सुटलेले, ते अजून निर्दाेष नाहीत; शंभूराज देसाईंनी करून दिली आठवण

By सुरेश लोखंडे | Updated: December 9, 2023 18:49 IST

भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील पंतप्रधानाच्या थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमानंतर देसाई ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात आले होते.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : राेज सकाळी १० वाजता काेणाला तरी शिव्याश्याप दिल्या शिवाय संजय राऊत यांचा दिवस जात नाही. ते चांगले बाेलू शकत नाही. त्यामुळे राऊतांनी आता एकाच प्रश्नाचे उत्तर द्यावे की 'ते  कुठल्या पुण्यकर्मासाठी ११० दिवस जेलमध्ये हाेते? याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे. त्यानंतरच त्यांनी आमच्या सरकारवर टीका करावी, त्यांना म्हणावे तुम्ही जामिनावर सुटलेले आहेत. त्या प्रकरणातून तुम्ही निर्दाेष सुटलेले नाही. त्या प्रकरणाची चाैकशी अजून सुरू, अशी आठवण उत्पादन शुल्क राज्यमंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत यांना करून दिली आहे. ते ठाणे जिल्हा दाैऱ्यावर असताना पत्रकारांशी बाेलत हाेते.

भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील पंतप्रधानाच्या थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमानंतर देसाई ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी बाेलते केले. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी राज्याचे सरकार दराेडाे टाकणाऱ्या घासिराम काेतवाल सारखे' असल्याची टीका केल्याचे देसाई यांच्या निदर्शनात आणून दिली, त्यावेळी देसाई यांनी ‘ ते ११० दिवस जेलमध्ये काेणत्या पुण्यकर्मासाठी  हाेते’ अशी आठवण राऊत यांना करून दिली. याशिवाय ते निर्दाेष सुटलेले नसून त्याप्रकरणी अजून चाैकशी सुरू असल्याचेही त्यांनी राऊतांना आठवण करून देत स्पष्ट केले.

सध्या राऊन राज्य सरकारवर नाहक पुराव्याशिवाय आराेप करीत असतात. ते आता आंगवळणी पडले आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना आता गांभीर्याने घेत नसल्याचेही देसाई यांनी सांगितले. राऊतांना भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आमदार नितेश राणे उत्तर देत असतात. त्यामुळे काेणाचे ऑडीट करा, काेणाचे करू नका, काेणाच्या काय गाेष्टी तपासा, अशा गाेष्ठी बाेलणे ही राऊतांची सवय आहे, ते त्यांच्या अंगवळणी पडली आहे. त्यांच्या या सवयीकडे पत्रकारांनीही दुर्लक्ष केले तर बरे हाेईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईSanjay Rautसंजय राऊत