तोल जाऊन नाल्यात पडलेल्या संजय म्हस्के यांची सुखरूप सुटका
By जितेंद्र कालेकर | Updated: November 23, 2023 19:00 IST2023-11-23T19:00:37+5:302023-11-23T19:00:51+5:30
कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल : शास्त्रीनगर येथील घटना

तोल जाऊन नाल्यात पडलेल्या संजय म्हस्के यांची सुखरूप सुटका
ठाणे: शास्त्रीनगर परिसरातील जानकादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील १५ फूट खोल नाल्यामध्ये बेघर असलेले ६० वर्षीय संजय म्हस्के हे तोल जाऊन पडले होते. त्यांची ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या विभागांनी तासाभरात सुखरूप सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही घटना गुरुवारी दुपारी सव्वा दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास उघड झाली. नाल्यातून सुखरुप बाहेर काढल्यानंतर त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वर्तकनगर पोलिस, आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दल या विभागांनी धाव घेत, शिडीच्या मदतीने नाल्यातील म्हस्के यांना सुखरूप बाहेर काढले. वेळीच ही बाब लक्षात आल्याने खोल नाल्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी जवळपास एक तासांचा कालावधी लागल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.