संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दीड एकरात अतिक्र मण
By Admin | Updated: February 20, 2016 02:00 IST2016-02-20T02:00:44+5:302016-02-20T02:00:44+5:30
वागळे इस्टेटमधील हनुमाननगर भागात अवघडबाबा मंदिरासमोरील वनजमिनीवरील जंगल तोडून व्यावसायिक गाळे, गोडाऊन, वाहन दुरु स्तीची दुकाने थाटली आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दीड एकरात अतिक्र मण
घोडबंदर : वागळे इस्टेटमधील हनुमाननगर भागात अवघडबाबा मंदिरासमोरील वनजमिनीवरील जंगल तोडून व्यावसायिक गाळे, गोडाऊन, वाहन दुरु स्तीची दुकाने थाटली आहेत. सध्या या ठिकाणी चाळ बांधण्याचे काम सुरू झाले आहे. वनजमिनीवरील घरे विकण्याचे तसेच भाड्याने देण्याचे काम सुरू असताना वनखाते कारवाई करण्यास कचरत आहे. अतिक्र मण करणाऱ्या इसमांची या भागात दहशत असल्यामुळे वन कर्मचारी घाबरून सदर जागेवर फिरकत नसल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संरक्षण भिंतीच्या आतील बाजूस मोठ्या प्रमाणावर हे अतिक्र मण सुरू आहे. जवळपास दीड एकर जागेत अतिक्र मण झाले आहे. सर्व्हे नंबर २६५ मध्ये प्लॉट क्र मांक ए/४६७ हा प्लॉट एमआयडीसीने एसई हिटर कॉर्पोरेशन कंपनीला दिला आहे. सदर प्लॉटला लागून जंगल आहे. ते आता हटवण्याचे काम सुरू आहे. सर्व्हे क्र मांक २६५ मध्ये ५८ मीटर लांबीची भिंत वनखात्याने बांधली असल्याचे वनखात्याने कबूल केले आहे.
दुसरीकडे सर्व्हे नंबर २६५
मधील २२ एकर १० गुंठे जमीन
खासगी वन असल्याचे
वनखाते सांगते. हा वनखात्याचा दुटप्पीपणा अतिक्र मण करणाऱ्यांना बळ देत असल्याचे स्पष्ट दिसते. एमआयडीसी आणि वनखात्याच्या वादात ही अतिक्र मणे काढली जात नाहीत. (वार्ताहर)